आपला जिल्हा

तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता दुमजली होणार!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली मंजुरी

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे चाकण इथुन थेट शिक्रापूर पर्यंतचा रस्ता आता दुमजली होणार आहे. आता हा रस्ता ८ पदरी होणार आहे. या संपूर्ण लांबीच्या पट्ट्यामध्ये ५७ किलोमीटर परिसरामध्ये एलिव्हेटेड ब्रिजच्या अंतर्गत उड्डाणपूल संपूर्ण तयार करण्यात येणार आहे याचसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डीपीआर बनविण्याच्या सुचना अधिकार्यांना दिल्या आहेत.

या आधी ४ पदरी रस्ता करण्यासाठी या रस्त्याला १०७८ कोटी रुपये मंजूर झाले होते , परंतु तळेगाव दाभाडे ते चाकण या रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या पाहता केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी पुणे नाशिक महामार्गाचे समन्वयक इंजिनिअर दिलीप मेदगे आणि खासदार गिरीश बापट यांनी याबाबत विस्तृत चर्चा केली, याच चर्चेचा प्रतिसाद म्हणून आणि स्थानिक लोकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे सकारात्मक विचार करून नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या बैठकीत पुढील पंचवीस वर्षाचे नियोजन लक्षात घेता नव्याने डीपीआर बनवण्याचे आदेश अधिकार्यांना दिल्याचे गडकरी यांनी सांगितले.यामुळे जरी या प्रकल्पाची किंमत वाढणार असली तरी या रस्त्याच्या चार लेन खाली व चार लेन पुलावर यामुळे फार मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन करावी लागणार नाही आहे , फक्त मधल्या पिलर्स साठी २ मीटर ची जागा फक्त वाढणार आहे . फक्त २० ते २२ मीटर रुंदी मधुन हा रस्ता तयार होणार असल्याचे दिलीप मेदगे यांनी सांगितले.

खालुम्ब्रे, म्हाळुंगे ,खराब वाडी येथे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे टळणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना खाली न उतरता थेट प्रवास करता येईल त्यामुळे तळेगाव ते चाकण हे अंतर फक्त विस मिनिटांमध्ये पार होईल. 53 किलोमीटरमध्ये सलग उड्डाणपूल असल्याने हे अंतर 40 ते 45 मिनिटांमध्ये विना थांबा पार करता येईल

तळेगाव ते शिक्रापूर येथील वाहतूकदारांना आणि प्रवाशांना खूप मोठा फायदा होणार आहे आणि या भागातील व्यवसायाला अधिक चालना मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये