ताज्या घडामोडी

येलूर हायस्कूल येलूर ता वाळवा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या *संकेत माणिकराव जाधव सभागृहाचे उदघाटन

Spread the love

सभागृहाचे उदघाटन अँड.बी. एस. पाटील(आण्णा) यांच्या हस्ते व वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या येलूर हायस्कूल चे विद्यार्थी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महासंचालक संदीप पाटील IPS यांच्या प्रमुख उपस्थित झाले. संदीप पाटील यांनी कमी वयात पोलीस सेवेमध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. नक्षलग्रस्त भागामध्ये त्यांनी शांतता व सुव्यवस्थेने त्या भागाच्या विकासाला चालना दिली आहे, अनेकांचे मतपरिवर्तन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणले आहे. अश्या कर्तृत्ववान विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेतील सुविधांचे उदघाटन हा अभिमानास्पद योग.येलूर हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक एम एल जाधव सरांनी त्यांच्या दिवंगत चिरंजीवाच्या स्मृतिप्रीत्यर्थ या सभागृहाची उभारणी केली.
सभागृहात होणाऱ्या विद्यार्थी उपयोगी उपक्रमातून संकेत च्या स्मृती जागृत राहतील.आमच्या संकेत याच्या आठवणी संकेत माणिकराव जाधव सभागृहाच्या माध्यमातून चिरंतर राहतील व आमचे बंधू एम.एल.जाधव सर व वहिनी यांना त्या रूपाने संकेत चा सहवास लाभेल व आमचे दादांनी या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून लोकांना एक चांगल्या विचाराचा संकेत दिला आहे ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
याप्रसंगी वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी चे मानद सचिव ऍंड बी एस पाटील आण्णा , इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्ष सौ अरुणादेवी पाटील, येलूर चे सरपंच विनायक महाडिक, गट शिक्षण अधिकारी अजिंक्य कुंभार, तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याचे संचालक संदीप जाधव
लक्ष्मी उद्योग समूह येडेनिपाणी चे अध्यक्ष आनंदराव पाटील ,चेतन जाधव भाऊ ,भगवानराव जाधव, धनाजीराव गायकवाड, बाळासाहेब जाधव, भास्करराव जाधव, ऍंड अशोकराव पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!