आपला जिल्हा

महिंद्रा कंपनीच्या गेटसमोर भारतीय कामगार सेनेच्या टिव्हीएक्स कामगारांचे आंदोलन

चिंचवड: महिंद्रा कंपनीच्या गेटसमोर भारतीय कामगार सेनेच्या टिव्हीएक्स कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

सुमारे तीनशे कामगार हे भारतीय कामगार सेनेचे सभासद असून सुद्धा कंपनी दुस-या कामगार संघटनेबरोबर करार करत असून कामगारांना हे मान्य नाही.त्यामुळे कामगारांनी युवा सेना उपजिल्हा प्रमुख गिरीश सातकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारले आहे.

तसेच किरकोळ कारणांमुळे पाच-सहा कामगारांवर कंपनीने कारवाई केली आहे.त्यांची कारवाई मागे घ्यावी अशी देखील मागणी कामगारांनी केली आहे.

यावेळी या कामगार आंदोलनला शिवसेना उपजिल्हा प्रमूख शरद हुलवळे,मावळ तालुका प्रमूख राजेश खांडभोर यांनी आंदोलन करते यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.

यावेळी उपतालुका प्रमूख मदन शेडगे उपतालुका आशिष ठोंबरे युवा सेना चिटणीस विशाल हुलवळे भा .वि .से.सह संघटक नितिन देशमुख प्रवीण ढोरे इत्यादी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये