आरोग्य व शिक्षण

वाडिवळे गेट ते खांडशी रस्त्याची देवाभाऊ गायकवाड यांनी केली स्वखर्चाने दुरूस्ती

Spread the love

लोणावळा : वाडिवळे ते खांडशी या नऊ गावांना जोडणारा रस्ता सामाजिक भावनेतून डागडुजी व स्वखर्चाने दुरूस्ती करण्याचे काम उद्योजक व लोकसेवक देवाभाऊ गायकवाड यांनी केले.

या रस्त्याची अत्यंत दुराव्यस्था झालेली होती, या रस्त्यावर अनेक जिवघेणे खड्डे निर्माण झाले होते, या रस्त्यावरून अनेक दुग्ध व्यवसायिक, कामगार, माता भगिणी प्रवास करत असतात, हे लक्षात घेता या रस्त्याची पाहणी केली असता सर्व प्रकार लक्षात आला. वाडिवळे, मुंढावरे , वळक, बुधवडी , सांगीसे , वेल्हवळी, नेसावे , खांडशी , उंबरवाडी या नऊ गावातील ग्रामस्थांनी युवा उद्योजक देवाभाऊ गायकवाड यांच्याकडे खंत व्यक्त केली होती.

रस्ता होणे गरजेचे आहे  तसेच  ग्रामस्थांच्या समस्या लक्षात घेवून जनसेवक पैलवान देवाभाऊ गायकवाड यांनी स्वखर्चातुन या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम आज त्वरीत पुर्ण करुन घेतले.

यावेळी मा सरपंच काळुरामशेठ थोरवे, मा सरपंच बबनराव टाकळकर, गोरखभाऊ बांगर, रामदासशेठ थोरवे, अनंता ढवळे, नवनाथ गायखे, रोहीदास पिंगळे, दिपक भेगडे, विनायक टाकळकर, गणेश टाकळकर, माऊली भांगरे, सोमनाथ खेंगले, निलेश खेंगले, संकेत खेंगले, अमोल बांगर, स्वप्निल ढवळे, अमोल थोरले, अजय थोरवे, देवराम थोरवे, ओमकार थोरवे आदी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!