आपला जिल्हा

चाकणच्या जाचक नवीन कररचनेसंदर्भात पालकमंत्र्यांना भेटणार – खासदार अमोल कोल्हे

चाकण : चाकणच्या नगरपरिषदेने जाचक कररचना केली आहे. कररचना करताना नागरिकांना विश्वासात घेतले नाही. ही कररचना नागरिकांचे कंबरडे मोडणारी आहे. या नवीन कररचने संदर्भात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याबरोबर लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भेटणार आहोत असे आश्वासन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी चाकण येथील एका कार्यक्रमात दिले.

या अन्यायकारक कररचनेची अंमलबजावणी करू नये असे निर्देश चाकणच्या मुख्याधिकारी यांना देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. या प्रश्नी आपण चाकणच्या जनतेसोबत आहोत असे खासदार डॉक्टर कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये