ताज्या घडामोडी

खंडाळा वाचनालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन थाटात संपन्न

Spread the love

खंडाळा येथे सार्वजनिक वाचनालय वाटद खंडाळा, ग्रामविकास मंडळ वाटद मिरवणे संचलित नवीन वास्तूचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष व नारळ विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्या हस्ते पार पडले. विशेष म्हणजे या वास्तूचा पाया राजाभाऊ लिमये यांच्या शुभ हस्ते जवळजवळ ३३ वर्षा पूर्वी केला गेला आणी त्यांच्याच शुभ हस्ते वाचनलायाचे शुभारंभ झाला हा सगळ्यात मोठा सुवर्ण योग आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय बिवलकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर राजाभाऊ लिमये यांनी फीत कापून उद्घाटन केले. नंतर श्री उपाध्ये यांनी ग्रामविकास मंडळाने  केलेल्या कामांचा आढावा घेणारी एक उत्तम चित्रफीत दाखवली.जेणे करुन मंडळाच्या कामाचा आढावा दिसला व जून्या आठवणी जाग्या झाल्या . मान्यवरांची भाषणे होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमासाठी विष्णुदत्त निमकर, प्रकाश कारखानीस, माजी समाजकल्याण सभापती जि.प. सदस्या सौ. ऋतुजा जाधव, पंचायत समिती सभापती सौ. संजना माने, पंचायत समिती सदस्या सौ. मेघना पाष्टे, शिवसेना विभाग प्रमुख योगेंद्र कल्याणकर, सरपंच ग्रामपंचायत वाटद – मिरवणे सौ. अंजली विभूते, आप्पा धनावडे ,भाई जाधव , धनावडे गुरुजी , आबा सुर्वे, युवा सेना उपतालुका प्रमुख आशिष भालेकर , अरुण मोर्ये , अंकलगे गुरुजी , जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले, डॉ. विजयकुमार जगताप, योगेश बिर्जे, नाना विचार, बाळशेठ जोग, ग्रंथपाल सार्वजनिक वाचनालय खंडाळा सौ. नीता शिर्के आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!