ताज्या घडामोडी

जाकादेवी येथील युवानेते प्रतिक देसाई यांच्यावर मित्रमंडळींसह विविध गावातून शुभेच्छांचा वर्षाव

Spread the love

जाकादेवी/ वार्ताहर

रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील युवा नेते प्रतिक सुधीर देसाई यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ प्रतिक देसाई यांचे मित्र मंडळ तसेच परिसरातील विविध गावांतील त्यांचे स्नेही व निष्ठावंत यांच्याकडून प्रतिक देसाई यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
जाकादेवी येथे झालेल्या शुभेच्छा सत्कारप्रसंगी अमर देसाई, हनुमंत कदम, रोहित मयेकर, संकेत देसाई, सुनिल पाटील, संभाजी गणेशकर, संतोष पवार, संजय थोरात, आशिष सावंत,बंटी सुर्वे, विलास शिंदे, सुरेश रणदिवे, उत्तम देशमुख, आण्णा गाटे, महेश जाधव, संदीप कुराडे, राहुल यादव, प्रकाश फराटे,रामचंद्र सोरे,यांसह अनेक मान्यवर व्यक्ती यांचा समावेश होता. तसेच देऊड खाण कामगारांच्या वस्तीमध्ये देखील प्रतिक देसाई यांचा यथोचित शुभेच्छापर सत्कार समारंभ करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते बंटी वणजू यांनी प्रत्यक्ष जाकादेवी येथे प्रतिक देसाई यांचा खास सत्कार करुन भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मेढे- मांजरे या ठिकाणी प्रतिक देसाई यांना मित्र मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या सत्काररूपी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रतिक देसाई यांचे सामाजिक कार्य अत्यंत प्रेरणादायी असून या युवा नेत्याने कमी वयात सामाजिक जाणीव आणि सामाजिक जाणिवेतून करत असलेली विविध समाजोपयोगी कामे , गोरगरीब होतकरूंना , क्रिडा स्पर्धांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच प्रसंगात केलेल्या सामाजिक व आर्थिक मदतीबद्दल युवा नेते प्रतिक देसाई यांचा अनेक मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी आदरपूर्वक उल्लेख करून प्रतिक देसाई यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. मित्र मंडळ व हितचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल गौरवमूर्ती प्रतिक देसाई यांनी कृतज्ञता व्यक्त करून सर्वांना धन्यवाद दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!