आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

एटीएम मध्ये मदत करण्याच्या बहाण्याने वृद्धाची फसवणूक

Spread the love

तळेगाव : एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्याने वृद्धाची 81 हजाराची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना तळेगाव दाभाडे शांताई सिटी येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये बुधवारी सकाळी घडली.

याप्रकरणी सुभाष रामकृष्ण भोपे (वय 81 रा. वैद्य कॉलनी तळेगाव दाभाडे ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भोपे बुधवारी सकाळच्या सुमारास एसबीआय बँकेच्या शांताई सिटी भागातील एटीएममध्ये मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने त्यांना विश्वासात घेत मदत करण्याच्या बहाण्याने कार्डची अदलाबदल केली.त्यानंतर एटीएमचा वापर करून त्यांची 81 हजारांची फसवणूक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!