ताज्या घडामोडी

मकर संक्रातीच्या दिवशी पदोन्नती करून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. – पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा आनंद केला व्दिगुणीत

Spread the love

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. – पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर जनतेसाठीच नव्हे तर पोलीस दलातील अमलदारांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून अत्यंत कमी वेळेत जनतेच्या आणि नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमंलदारांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.

वर्षानूवर्षे पोलीस दलात परिश्रम करुन पोलीस अमंलदार आपल्या पदोन्नतीची वाट पाहत असतात. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पदोन्नती देणाऱ्या संबंधीत शाखेच्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना नंदुरबार जिल्ह्यातील पदोन्नतीस सेवाजेष्ठतेनुसार पात्र असलेल्या सर्व पोलीस अमलदारांना पदोन्नती देणेबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्याबाबतची सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करुन दिनांक 04/01/2022 रोजी नूतन वर्षात 53 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर व मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येस दिनांक 13/01/2022 रोजी 71 पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली. मकर संक्रातीच्या दिवशी पदोन्नती झाल्याने पोलीस अमंलदारांचा आनंद द्विगुणीत होवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
पदोन्नती झालेल्या जिल्ह्यातील 53 पैकी 20 पोलीस अमलदारांना पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील मैदानावर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करुन कार्यक्रम आयोजीत करुन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्वतः पदोन्नती झालेल्या पोलीस अमंलदारांना पोलीस हवालदार पदाची फित लावून पोलीस अमंलदारांचे अभिनंदन केले व पोलीस दलातील पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 53 पोलीसनाईक यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देऊन नवीन वर्षाची भेट व 71 पोलीस शिपाई यांना सेवा जेष्ठतेनुसार पोलीस नाईक पदावर पदोन्नती देऊन पोलीस अमलदारांना संक्रांत गोड केली आहे. तसेच यापूर्वी ही नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून 34 पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उप निरीक्षक पदी सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती दिलेले आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील हे खऱ्या अर्थाने पोलीस अमलदारांच्या समस्या ऐकून त्याची तात्काळ अमंलबजावणी करत असतात अशी चर्चा सद्या पोलीस दलात केली जात आहे व त्याबाबत पोलीस अमंलदारांकडून समाधान व्यक्त होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!