ताज्या घडामोडी

जेजुरी मध्यें ८ नोव्हेंबर रोजी मौर्य क्रांती महासंघा ‘ च्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन.

Spread the love

भारत कवितके मुंबई कांदिवली
मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत जेजुरी येथील जय मल्हार सांस्कृतिक भवन या ठिकाणीं सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त मौर्य क्रांती महासंघाने राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनात ‘ सर्व जातीची जातनिहाय जनगणना का ? व कशासाठी? अथवा संख्येच्या प्रमाणांत प्रतिनिधित्व दिल्यानेच सर्व जातीची प्रगती होणे शक्य आहे ‘ यावर विचार विनिमय , सत्यशोधक मारोतराव पिसाळ मामा स्मरणार्थ सत्यशोधक प्रबोधनकार पुरस्काराचे वितरण प्रथम मानकरी गोविंदराम शूरनर (लेखक,वक्ते,प्रबोधनकार) ,संचित धान्ये लिखीत महानायक श्री.खंडोबा व गोविंदराम शूरनर लिखीत ‘ बहुजनाचे प्रबोधन’ या पुस्तकांचे प्रकाशन, सत्यशोधकीय विधी कर्ते डाॅ. दत्तात्रय जगताप यांचा सन्मान सोहळा,राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा विजेतांचा सन्मान सोहळा (संयोजक राजीव हाके),’ एकट्याने नाही तर एकीने लढू या ‘ या सिध्दांतावर काम न करते हेच आपल्या सर्व समस्याचे कारण आहे,’ यावर चर्चा,शाहीर सागर माने आणि सहकारी वाळवा,सांगली यांचे सुंबरान चांगभलं चा कार्यक्रम ,आदि कार्यक्रमाचा समावेश असून दुपारी २ ते २:३०या वेळेत मानसन्मान फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व्दारा भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटक शिवाजी शेंडगे,प्रमुख पाहुणे लक्ष्मण व्हटकर,अनिल कुमार ढोले,अंकुश निर्मळ,प्रविण काकडे,संदिप जगताप,माधव गडदे,डाॅ. प्रेमसागर, सुनिल ( तात्या) भगत,निलेश मोटे,पी.बी.कोकरे,रमेश लेंडे,महादेव गोकार,संपत कोळेकर,पांडुरंग धायगुडे, धनश्रीताई आजने,जोतिबा पिसाळ,यशवंत पडळकर,अशोक बरकडे,आनंदा होनमाने,दिनेश देवडकर,दिनकर सोनवलकर,सुभाष येळे,मोहन महाराज खोमने,राहुल मदने,कमलाकांत काळे,कल्याणराव दळे,रामलखन पाल,मबारक नदाफ,तुकाराम माळी,भारत कवितके, उपस्थित राहणार आहेत. तसेच राजीव हाके,उत्तमभाई कोळेकर, हणमंत दवंडे,तुकाराम जानकर,गुरुगोविंद सौन्नर,शैला नवघरे,साईनाथ बंडगर,सह मौर्य क्रांती महासंघाचे इतर विभागीय पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित राहणार आहेत. तर सोशल मिडीया अमोल पांढरे उपस्थित राहणार आहे. धनगर बहुजन जाती जमातीतील विद्यार्थि,युवा,महिला,बुध्दीजीवी,कर्मचारी,सामाजीक कार्यकर्ते, आणि हितचिंतकांनी या राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थित राहवे असे आवाहन मौर्य क्रांती महासंघाचे संस्थापक,अध्यक्ष बलभीम माथेले यांनी केले आहे.अशी माहिती धनगर समाजाचे जेष्ठ पत्रकार, साहित्यिक ,सामाजीक कार्यकर्ते, भारत कवितके मुंबई यांनी दिलेली आहे.
भारत कवितके मुंबई कांदिवली मोबाईल ८६५२३०५७००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!