आपला जिल्हा

‘मराठ्यांची गौरवगाथा’ या महानाट्याचा लोणावळ्यात 11 डिसेंबर रोजी मोफत प्रयोग

लोणावळा : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘मराठ्यांची गौरवगाथा’ या महानाट्याचा मोफत प्रयोग लोणावळ्यातील डॉ. बी. एन. पुरंदरे शाळेच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजता शनिवार (11 डिसेंबर) रोजी होणार आहे.

स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी लोणावळा नगरपरिषद व मावळ वार्ता फाऊंडेशनच्या माध्यमातून या महानाट्याचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला मावळ वार्ता फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पारेख , ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, मावळ वार्ताचे संचालक संजय अडसुळे, विनय विव्दंस, नवीन भुरट, जितेंद्र कल्याणजी,शिवदुर्गचे सुनील गायकवाड, राजेंद्र कडू, महेश म्हसणे, अजय शेलार व महानाट्याचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण देशमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये