क्राईम न्युज

नेर्ले ( ता.वाळवा ) सांगली कोल्हापूर मार्गावर भीषण अपघात; दोन इंजिनीयर तरुण जागीच ठार ……

Spread the love

सविस्तर असे की , सांगली -कोल्हापूर मार्गावर मालेफाटया नजीक स्कूल बसची मोटरसायकलला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन सिव्हिल इजिंनियर युवकांचा जागीच मृत्यू झाला. शितल बाळासो पाटील.( वय 2४ ) रा. हरोली ता. शिरोळ व सुरज श्रीकांत शिंदे (वय २३ ) रा. चंदूर ता. हातकणंगले अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दोन युवकांची नावे आहेत.

अपघातात जखमी झालेल्या जखमी वृध्द महिलेला उपचारासाठी कोल्हापूरला पाठवल्याने नाव समजू शकले नाही.याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी हे दोघे दुपारच्या सुमारास होंडा शाईन मोटार सायकल क्र. ( एम.एच. o९-११०९ ) वरून कोल्हापूर  जिल्हा परिषदेतील  मिटींगला जात होते. माले फाटयानजीक एक भाजी विक्रेती वृध्द महिला अचानक आडवी आल्याने  तिला मोटार सायकलची  धडक बसली.  यामुळे त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला. दरम्यान पाठी मागून येत असलेल्या  स्कूल बसने त्याना  धडक दिली यामुळे दोघेही डांबरी रस्त्यावर जोरांने आपटले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठया प्रमाणात  रक्तस्त्राव झाल्याने शीतल पाटील आणि सुरेश शिंदे या दोघांचा जागीच मुत्यु झाला. तर या अपघातात एक वृध्द महिला गंभीर जखमी झाली असुन तिच्यावर कोल्हापूरातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हातकणंगले पोलीसांनी स्कुल बस चालक महादेव शंकर आरडे ( वय. ५६ ) रा. कळंबा ता. करवीर जि. कोल्हापूर याच्यावर गुन्हा दाखल केला असुन या बाबतची फिर्याद वैभव श्रीकांत शिंदे ( वय.२५ ) रा. यशवंत कॉलनी इचलकरंजी (मुळ गाव चंदूर ) यांनी दिली आहे.
…..दहा दिवसापूर्वी साखरपुडा आणि आज मृत्यू…
सुरज शिंदे हा अत्यंत मन मिळावू स्वभावाचा व कोणाच्याही मदतीला धाऊन जाणारा होता. त्याच्या वडीलांचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते. यानंतर  एका वर्षाच्या आत त्याचे लग्न कराचे असल्याने दहा दिवसा पूर्वी त्याचा साखर पुडा झाला होता. तो मुळचा चंदूर येथील असुन इचलकरंजी मध्ये राहत होता. त्याच्याखाली अपघाती निधनामुळे नातेवाईक आणि मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!