आपला जिल्हा

वेहेरगावमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा

मळवली : भारतीय संविधान दिनानिमित्त काल (दिनांक 26 नोव्हेंबर) रोजी ग्रुप ग्रामपंचायत वेहेरगांव-दहिवलीच्या(मावळ) वतीने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.

सरपंच अर्चना देवकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपसरपंच काजलताई पडवळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या पूजाताई पडवळ, योगिताताई पडवळ, वर्षाताई मावकर, ग्रामपंचायत सदस्य  राजूशेठ देवकर,अनिल गायकवाड, शकरं बोरकर,सुनील येवले, जिल्हा परिषद शाळा वेहेरगांव मुख्याध्यापक  सहदेव डोंबे, ग्रामसेवक  गणेश आंबेकर भाऊसाहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  संतोष देवकर,उपाध्यक्षा  रेखा गायकवाड, ज्ञानेश्वर काशीकर, संदीप देवकर, नवनाथ पडवळ, सागर शिंदे तसेच ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये संविधान प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य  अनिल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

तद्नंतर जिल्हा परिषद शाळा वेहेरगांव येथे जिल्हा परिषद सदस्या  कुसुमताई ज्ञानेश्वरजी काशीकर यांच्या हस्ते संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधान या ग्रंथाचे पूजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग,विद्यार्थी विद्यार्थिनी व उपस्थित सर्व मान्यवरांनी भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन केले. शाळेतील मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये