आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडी

कामशेतच्या स्मार्ट बिगिनींग प्री स्कूलने “रस्ता सुरक्षा अभियान हा स्तुत्य उपक्रम राबविला.

शिंळिंब खोरे एज्युकेशन सोसायटीचे स्मार्ट बिगिनींग प्री स्कूल,कामशेत च्या वतीने आज रोड सेफ्टी ड्राईव्ह(रस्ता सुरक्षा अभियान) चे आयोजन 23 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.00 घेण्यात आले.

Spread the love

कामशेतच्या स्मार्ट बिगिनींग प्री स्कूलने “रस्ता सुरक्षा अभियान हा स्तुत्य उपक्रम राबविला.Kamshet’s Smart Beginning Pre School conducted a commendable activity called “Road Safety Campaign”.

आवाज न्यूज : कामशेत प्रतिनिधी, २३ फेब्रुवारी.

शिंळिंब खोरे एज्युकेशन सोसायटीचे स्मार्ट बिगिनींग प्री स्कूल,कामशेत च्या वतीने आज रोड सेफ्टी ड्राईव्ह(रस्ता सुरक्षा अभियान) चे आयोजन 23 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.00 घेण्यात आले.या अभियानात शाळेच्या 25/30 विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपने सहभाग घेतला.सर्वप्रथम सर्व मुले व शिक्षक वृंद कामशेत पोलीस स्टेशनमध्ये जमले, तिथे पोलीस अधिकारी आकाश पवार आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

तिथे सर्व मुलांनी रस्ता सुरक्षा संदर्भात घोषणाबाजी केली त्यानंतर पोलिस अधिकारी आकाश पवार व इतर कर्मचारी यांनी त्याठिकाणी मुलांशी गंमतीशीर संवाद साधला.आकाश पवार सरांनी गमतीदार प्रश्न विचारले.आणि विद्यार्थ्यांनी कठीण समयी काय केले पाहिजे.त्याच प्रमाणे आपल्या वडिलांच्या गाडीवर बसल्यावर वडिलांना काय सांगायचे हे समजावून सांगितले.पोलिसांनी सर्व मुलांचे,शिक्षकांचे व शाळेचे तोंडभरून कौतुक केले.

 

त्यानंतर मुलांनी पोलिसांना व उपस्थित ग्रामस्थांना ट्रॅफिक संदर्भातील ग्रीटिंग कार्ड भेट दिले, पोलिसांनी ही मुलांना कॅडबरी चॉकलेट व खाऊ वाटप केले,त्यानंतर पोलीस स्टेशन ते शिवाजी चौक मुलांनी पायी रॅली काढून ट्रॅफिक विषयी घोषणाबाजी करून जनजागृती केली.त्यानंतर शिवाजी चौक येथे  आल्यानंतर कामशेतमधील ग्रामस्थांनी शाळेचे व विद्यार्थ्यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले.

या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल ओव्हाळ शाळेच्या शिक्षिका रुक्सर शेख, राजेश्री गायकवाड दीपाली बंडे यांच्या कल्पनेतून आला.या कार्यक्रमाला पोलीस कर्मचारी त्याच प्रमाणे अजित नेहरकर,सागर शिंदे, सुभाष भोते, निलेश गायकवाड हेही उपस्थित होते. यानंतर रोड सेफ्टी प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!