आपला जिल्हा

महाराष्ट्र भूषण, शिवछञपती यांचे जीवनचरिञ अभ्यासक कै.ब.मो.तथा बाबासाहेब पुरंदरे यांना लोणावळ्यात आभिवादन

लोणावळा : महाराष्ट्र भूषण, शिवछञपती यांचे जीवनचरिञ आभ्यासक कै.ब.मो.तथा बाबासाहेब पुरंदरे यांना लोणावळ्यात आभिवादन करण्यात आले.

वयाच्या शंभरीपार असणारे बाबासाहेब यांच्या आठवणींना शिवप्रेमींनी उजाळा दिला. हिंदू समितीने आयोजित केलेल्या शोकसभेत राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , क्रीडा , तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आठवणी काढून बाबासाहेब पुरंदरे यांच्या जीवनातील प्रसंग कथन केले.

लोणावळ्याच्या प्रथम नागरिक , नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यावेळी म्हणाल्या , आम्ही बाबासाहेब पुरंदरे यांचे वाढदिवसानिमित्त पुण्यात गेलो असता त्यांनी आपुलकीने आमचे स्वागत केले.तसेच आमच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.त्यांचे मावळातील काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करीन असे सांगितले. यावेळी पञकार  आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूञसंचालन हिंदू समितीचे पदाधिकारी आनंद गावडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये