आरोग्य व शिक्षण

दारुंब्रे गावात नवरात्र उत्सवानिमत्त कविभुषण विठ्ठल दळवी यांचा सत्कार

Spread the love

शिरगाव : दारुंब्रे गावी महाराष्ट्राची परंपरा जपत नवरात्र उत्सवा दरम्यान १७ पुरस्कार प्राप्त कविभुषण विठ्ठल दळवी यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये वाघजाई मातेच्या डोंगराच्या कुशीत वसलेले एक टुमदार असे दारुंब्रे गाव. हिंदू संस्कृतीनं विविध परंपरेने नटलेल्या या गावामध्ये दरवर्षी हिंदू परंपरेनुसार नवरात्र उत्सव उत्सहात साजरा केला जातो.

याहीवर्षी कलाकारांनी भजनी, भारुडरुपी कला दाखवत हसत खेळत आपल्या गावची मनोभावे सेवा करत हिंदू परंपरेचा वसा वारसा जपत महाराष्टाच्या संस्कृती मध्ये भर घालत वरिष्ठांचा मान राखत विविध कलागुण दाखवत नवरात्र उत्सव साजरा केला.

कोरोना पासुन सुटका होऊ दे, पून्हा सुंदर दिवस येउ दे, असे वाघजाई मातेकडे साकडे ग्रामस्थांच्या वतीने घालण्यात आले.

दरम्यान याच गावातील एक कलाकार अभिनय सभ्राट कै.आशाभाऊ वाघोले यांनी कोरोणाच्या महाभयंकर काळात आपली जीवनयात्रा संपवून संपूर्ण गावाला एक दुःखद धक्का दिला, त्यांच्या जाण्यानं जी रंगमंचावर उणीव भासली, ती कुणीच भरून नाही काढली, याच काळात संपूर्ण गावाने व कलाकारांनी अश्रुनयनांनी आमच्या लाडक्या आशाभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान याच गावातील पंचक्रोशी विधालयाचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा महासंघ कविभुषण पुरस्कार प्राप्त असे १७ पुरस्कार व राष्ट्रीय पुरस्कार मिळवत दारुंबरे व मावळचे नाव उंचावत, थोर संताच्या कार्याची व छत्रपती शिवरायांच्या धगधगता इतिहासाची महती सांगत, विचारांतुन समाजाची सेवा करत, समाजाला विचायांशिवाय पर्याय नाही, महाराष्ट्र भर संताच्या विचारांची, संस्कृतीची जाणीव करून देणा-या विठ्ठल दळवी  यांच्या कार्याची दखल घेऊन दारूबंरे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच गणेश वाघोले, मावळ तालुका पोलीस पाटील संघटना अध्यक्ष लक्ष्मण शितोळे, जयहिंद बँकेचे संचालक गुलाब वाघोले, ग्रा. प. सदस्य सुर्यकांत वाघोले, वंदे मातरम संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी वाघोले, यादव सोरटे, बाळुमामा भोंडवे, कांतीलाल सोरटे, ज्ञानोबा वाघोले, दिपक सोरटे, घनश्याम ढमाले, हभप पांडुरंग वाघोले, अभिजित सोरटे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!