आपला जिल्हा

राज्यात मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी

मुंबई : राज्य सरकारने मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दीड वर्षाच्या कालावधी नंतर तमाशाच्या फडापासून शाहिरी पर्यंतचे कार्यक्रम होणार आहेत.

राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकात राज्याच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोककलांना मोकळ्या जागेत कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात तमाशा, दशावतार,भारुड, शाहिरी इत्यादी कार्यक्रमांसह टुरिंग टॉकीजला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कलावंतांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये