ताज्या घडामोडी

एम.बी.बी.एस. पदवी संपादित डॉ. स्वरूप संतोष मोहिते यांचा बदलापूर येथे प्रेरणादायी भव्य सत्कार उत्साहात संपन्न

Spread the love

अनेक मान्यवरांकडून मोहिते परिवाराचे कौतुक
जाकादेवी/वार्ताहर:-
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील बेलारी गावचे सुपुत्र तसेच रत्नागिरी शहराठिकाणी वास्तव्यास असलेले शैक्षणिक ,सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व,उपक्रमशील शिक्षक संतोष विठ्ठल मोहिते आणि सौ.स्नेहा संतोष मोहिते यांचा सुपुत्र स्वरूप मोहिते यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस उच्चतम पदवी टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथून संपादन केल्याप्रित्यर्थ बदलापूर (पूर्व) शहरातील संजीवनी हॉल येथे डॉ. स्वरूप मोहिते यांचा मोहिते परिवारासह बेलारी बौद्धजन विकास मंडळ शाखा मुंबई यांच्या वतीने प्रेरणादायी शुभेच्छा सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये मुंबई मंडळाचे अध्यक्ष संजय मोहिते, सचिव अनिल जाधव, सल्लागार तुळशीराम जाधव, सिध्दार्थ जाधव, प्रकाश जाधव, अरुण कदम, रमेश मोहिते, डॉ.आंबेडकर स्मारक कमिटीचे अध्यक्ष अशोक जाधव,सुहास मोहिते, प्रदीप सावंत, गौतम सावंत डॉ.श्री.सौ.चिंचखेडे, स्वप्निल कदम, पत्रकार संतोष पवार, रमाकांत पवार, संतोष मोहिते,सौ.स्नेहा मोहिते,सौ.समिक्षा पवार ,अविनाश मोहिते यांसह मोहिते, पवार,शिर्के,तांबे, जाधव आणि मोटघर परिवारातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
डॉ. स्वरूप यांने बारावी सायन्सपर्यंत शिक्षण कोल्हापूर येथील संजय घोडावत येथे पूर्ण केले. पुढे टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे प्रवेश घेतला.येथून त्यांनी उच्चतम एम.बी.बी.एस. पदवी संपादन केली.
संतोष मोहिते यांचा मोठा मुलगा स्वप्नज मोहिते यांने पंजाब अमृतसर येथून एम.बीए शिक्षण पूर्ण केले.सध्या स्वप्नज हा इन्फोसिस कंपनी बंगलोर येथे नोकरी करत असून भविष्यात युरोप येथे नोकरीसाठी जाण्याचा त्यांचा मानस त्यांनी बोलून दाखवला.शिवाय संतोष मोहिते यांचे ज्येष्ठ बंधू दिलीप मोहिते हे दापोली येथे शिक्षक असून त्यांचे दोन्ही मुलगे निनाद आणि निषात इंजिनिअर असून (गुजरात) अहमदाबाद येथे दोघांनी एन.आय.डी.मध्ये डिग्री प्राप्त करून बेंगलोर या ठिकाणी मोठ्या कंपनीत नोकरीला आहेत.उच्चशिक्षण घेऊन या घराण्यातील युवक आपले ध्येय साध्य करताना दिसत आहेत.
शिक्षकी पेशातील श्री.सौ.मोहिते दांपत्याने आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजापुढे चांगला आदर्श घालून दिला आहे.आजच्या नव्या पिढीने अशा युवकांकडून प्रेरणा घ्यावी अशी त्यांनी झेप आहे असे गौरवोद्गार या समारंभात अनेक मान्यवरांनी काढले.
डॉ.स्वरुप मोहिते आणि स्वप्नज मोहिते यांच्या उज्वल वाटचालीला प्रेरणा मिळावी, थोरामोठ्यांचे आशीर्वादाबरोबरच मार्गदर्शन मिळावेत, यासाठी हा शुभेच्छा सत्कार समारंभ बेलारी मोहिते परिवार व आप्तेष्ट यांनी बदलापूर येथे आयोजित केला होता.वैद्यकिय क्षेत्रातील मी एम‌बी.बी.एस पदवी संपादन केल्याप्रित्यर्थ आपण बहुसंख्येने उपस्थित राहून मला व माझ्या कुटुंबीयांना मनापासून शुभेच्छा दिल्यात,हदृय सत्कार घडवून आणलात त्याबद्दल डॉ.स्वरुप मोहिते , आयोजक संतोष मोहिते ,सौ.स्नेहा मोहिते यांनी उपस्थितांना धन्यवाद दिले.विशेष म्हणजे मोहिते कुटुंबीयांनी उपस्थित सर्व मान्यवर व आप्तेष्ट यांना धार्मिक बुद्ध पूजापाठाचे संस्कारक्षम पुस्तक व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.हा शुभेच्छा सत्कार समारंभ अनेकांना प्रेरक ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!