महाराष्ट्र

ओमीक्रोन कोरोना व्हेरीयंटच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारचे नवे नियम

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाचा नव्या ओमिक्रोन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

सरकारने लागू केलेले नियम खालीलप्रमाणे

  • इतर राज्यतून येणारा प्रवासी दोन्ही लस घेतलेला असावा किंवा 72 तासापूर्वी RT -PCR चाचणी केलेला असावा.
  • राज्यात सार्वजनिक वाहतुकीसाठी लसीच्या दोन्ही डोसची अट ठेवण्यात आली आहे. कार्यक्रम, सभाग्रह,मॉल्स यामध्येही प्रवेशासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
  • मास्क परिधान करणे बंधनकारक आहे.अन्यथा 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
  • राजकीय सभा कार्यक्रमांमध्ये कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास पन्नास हजारांचा दंड आकारला जाणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोनाचा नवा विषाणू हा चिंताजनक असल्याचं जाहीर केल आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील विविध राज्यांनी प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये