आरोग्य व शिक्षण

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने मृत्यू पावलेल्या वारकरी महिलांना श्रध्दांजली

Spread the love

लोणावळा : मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने मृत्यू पावलेल्या वारकरी महिलांना श्रध्दांजली वाहण्यात आली. ता.२७ रोजी सकाळी सातेफाटा येथे झालेल्या टेम्पोच्या भीषण अपघातात कोकणातील दिंडीमधील चार वारकरी महिलांचा दुर्दैवीपणे मृत्यू झाल्याने मावळातही सर्वञ हळहळ व संतप्त भावना व्यक्त होत आहे.

जाभूळ फाटा येथील संतकृपा व्यापारी संकूल येथील मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाने येणाऱ्या दिंड्यांना अन्नदान वाटप केले. यावेळी रोहा ते आळंदी कोकणदिंडीचे आगमन माऊली तुकाराम चे गजरात झाल्यनंतर विणेकरी व दिंडीचे चालक ह.भ.प. पुरूषोत्तम महाराज पाटील यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे, सचिव रामदास पडवळ यांचेसह नाणेमावळ विभाग अध्यक्ष नवनाथ थोरवे , सागर शेटे, विजय शेटे,दिपक वारिंगे, आनंद गराडे,गोविंद सावले तसेच नवघणे महाराज आदि उपस्थित होते. यावेळी ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील , रोहा ते आळंदी दिंडी चालक यांनी आपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चार महिलांना दुखित अंतकरणाने श्रध्दांजली वाहून अशा घटना आपल्या हातात नाही. आपण कितीही सावधपणे चाललो तरी कधी काय होईल , सांगता येत नाही.तेव्हा नामचिंतन हेच आपणास तारील , तेव्हा वारकरी , दिंड्यांना त्यांनी नामाचा जप चालू राहू द्या .सरकार ने रस्त्याच्या रूंदीकरणासाठी काही प्रयत्न करावा. पायी चालणाऱ्या लोकांचा विचार वाहनचालक यांनी करूनच वाहन चालवावे. मावळ तालुका वारकरी सांप्रदाय सचिव रामदास पडवळ व मंडळांच्यावतीने सरकारकडे मागणी करण्यात आली की , वारकरी महिलांचा मृत्यू ही दुःखदायक घटना असून आपघातात मृत्यू पावलेल्या वारकरी महिलांचे नातेवाईक यांना प्रत्येकी पन्नास हजार प्रसिद्ध उद्योजक व ए वन चिक्की चे मालक श्रीमंत रमेशचंद्रजी व्यास यांचेतर्फे जाहीर करण्यात आले आहेत.

सरकारने या मृत्यूमुखी पडलेल्या वारकरी महिलांचे नातेवाईक यांना प्रत्येकी पाच लाख व जखमी झालेल्या वारकरी यांना प्रत्येकी दोन लाख रूपये द्यावेत , तसे निवेदन आम्ही राज्य सरकारला देणार असल्याचे यावेळी सांगितले . सूञसंचालन पडवळ यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!