ताज्या घडामोडी

श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान, वेरळ समर्थ कृपा इंग्लिश मेडिअम स्कुल आणि ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने स्टुडंट ट्युटोरीअल चिपळूण येथे मोफत करिअर मार्गदर्शन मेळावा संपन्न

Spread the love

श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान, वेरळ ता. खेड जि. रत्नागिरी च्या श्री समर्थ कृपा इंग्लिश मेडिअम स्कुल आणि ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने स्टुडंट ट्युटोरीअल चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत करिअर मार्गदर्शन मेळाव्यात दहावी नंतरच्या करिअरच्या विविधांगी दिशा यावर मार्गदर्शन करताना *करिअर मार्गदर्शक तथा व्याख्याते श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर.
यावेळी मार्गदर्शनात दहावी नंतर असणाऱ्या करिअरचे विविध मार्ग आणि ते मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या बाबींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. सुयशजी पाष्टे साहेब, त्यांचे सहकारी डॉ. भोसले साहेब, कॉलेजचे प्राचार्य प्रा. अली सर, स्टुडंट ट्युटोरीअलचे श्री. तिवारी सर यांच्यासह कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी, पालक आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!