आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अंतर्गत सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या शूटिंगबॉल स्पर्धेमध्ये निगडी भक्तीशक्ती आगार संघ प्रथम क्रमांकाने विजयी..

Spread the love

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अंतर्गत सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या शूटिंगबॉल स्पर्धेमध्ये निगडी भक्तीशक्ती आगार संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला.Nigdi Bhaktishakti Agar team won the first place in the shooting ball competition organized under Pune Mahanagar Transport Corporation on the occasion of its sixteenth anniversary.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १६ एप्रिल.

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे एकूण १५ डेपो आहेत. त्यामधील १० डेपोच्या संघानी शूटिंगबॉल स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा हडपसर येथील शेवाळवाडी आगारामध्ये मध्ये (दि. १४ ते १५ एप्रिल) रोजी एकूण दोन दिवस पर्यंत संपन्न झाली.

सदर स्पर्धा पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या दि. १९ रोजी होणाऱ्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये भाग घेऊन विजयी झाल्याबद्दल भक्तीशक्ती आगारातील प्रमुख शांताराम वाघिरे पाटील यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक करून अभिनंदन केले.
याचा बक्षीस समारंभ वर्धापन दिनी गणेश क्रीडा कला मंच स्वारगेट येथे संपन्न होणार आहे.

या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या भोसरी आगरातील कर्मचाऱ्यांनी पटकविला आहे. शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये भक्ती शक्ती आगारातील कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट खेळाडू ज्ञानेश्वर पवळे यास खांद्यावरती घेऊन आनंदोत्सव साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!