ताज्या घडामोडी

महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री व आमदार श्री सदाभाऊ खोत यांच्या स्थानिक विकास निधीतून इस्लामपूर शहरातील मंजूर कामे त्वरित सुरू करून पूर्ण करा अन्यथा नगरपालिका प्रशासना विरोधात तिव्र आंदोलन करणार

Spread the love

रयत क्रांती पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, युवा नेते मा. सागरभाऊ खोत यांच्या उपस्थितीत इस्लामपूर नगरपरिषदेचे प्रशासन मुख्याधिकारी श्री. वैभव साबळे साहेब यांना माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत (साहेब) यांच्या आमदार फंडातून इस्लामपूर शहरात मंजूर असलेले कामे पूर्ण करण्याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले .

युवा नेते सागरभाऊ खोत बोलताना म्हणाले की, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार श्री. सदाभाऊ खोत यांच्या स्थानिक विकास निधीतून जी इस्लामपूर शहरासाठी विकास कामे प्रस्तावित केली आहेत ती सर्व कामे तातडीने सुरू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा इस्लामपूर शहर रयत क्रांती पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयास कुलूप लावून टाळेबंदी स्वरुपाचे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रयत क्रांती संघटना अल्प संख्यांक आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री मोहसीन पटवेकर व इस्लामपूर शहराध्यक्ष श्री. सर्फराज डाके यांनी यावेळी दिला आहे.

इस्लामपूर नगरपरिषदेचे प्रशासन मुख्याधिकारी श्री. वैभव साबळे यांना याबाबत रयत क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे

यावेळी रयत क्रांती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवा नेते सागरभाऊ खोत, रयत क्रांती संघटनेचे अल्फसंख्याक जिल्हा अध्यक्ष मोहसीन पटवेकर , कामगार नेते संदीप पाटोळे , इस्लामपूर शहर अध्यक्ष श्री. सर्फराज डाके , अमीर हवलदार , जितेंद्र सूर्यवंशी , स्वप्नील लोहार , अभिनव हुबाळे , स्वप्नील सूर्यवंशी , अनिकेत पाटील , रोहन बाबर , सारंग बाबर , निलेश दाभाडे , विक्रांत गोदकर , महंमद इबुशे , तोहा मुल्ला , इरफान सय्यद , अबू मणेर , जोहर जमादार , असीम इबुशे , तन्वीर दिवाण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!