ताज्या घडामोडी
योगीता अनिल माळी यांना पुरस्कार जाहीर
उद्योजकांची पुरस्कारासाठी निवड सांगली : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सन २०२१ या वर्षासाठी जिल्ह्यातील उद्योजकांची जिल्हा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम पुरस्कार वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील योगीता अनिल माळी यांच्या मे व्यास एंटरप्रायजेस तर द्वितीय पुरस्कार पलूस तालुक्यातील कुंडल येथील सचिन बाबासाहेब लाड यांच्या मे. राजतिलक इंडस्ट्रीज यांना मिळाला आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी दिली.