आपला जिल्हा

पथारीधारक भाजी व फळ विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी – तळेगाव शहर शिवसेना

तळेगाव : शहरातील रस्त्यावर व्यवसायास बसणाऱ्या भाजी व फळ विक्रेत्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी तळेगाव शहर शिवसेनेने निवेदनाद्वारे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्याकडे केली आहे.

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसाय बंद पडले. अशा परिस्थितीत लोकांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भाजी व फळांचा व्यवसाय सुरू केला. भाजीमंडईत म्हणावा तसा व्यवसाय होत नसल्याने रस्त्यावर बसण्यास सुरुवात केली. या सर्व रस्त्यावर पथारी मांडून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी होणार नाही अशा पद्धतीने पाच ते सहा जणांच्या जमावाला जागा उपलब्ध करुन द्यावी त्यामुळे कोरोनावर प्रतिबंध ही लागेल असे निवेदनात म्हटले आहे.

या गरीब व्यवसायिकांची उपजीविका रोजच्या व्यवसायावर आहे. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची आपण खबरदारी घ्यावी. योग्य तो पर्याय काढावा असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी राजूभाऊ खांडभोर तालुकाप्रमुख, दत्ता भेगडे मुख्य शहर प्रमुख, देव खरटमल स्टेशन शहर प्रमुख,सिद्धनाथ नलवडे गाव विभाग शहर प्रमुख,सतीश गरुड कार्याध्यक्ष ,सदाशिव भोसले विभाग प्रमुख  उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये