ताज्या घडामोडी

रत्नागिरीत शिक्षक सेनेचा कृतज्ञता आणि कार्यगौरव सोहळा उत्साहात संपन्न

Spread the love

रत्नागिरी मराठा भवन येथे नुकताच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने कृतज्ञता आणि कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मा.ना.उदयजी सामंत साहेब उपस्थित होते.त्यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करताना करताना सांगितले की,शिक्षक संघटना ही शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी संघटना हवीच पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हितासाठी,प्रगतीसाठी झटणारी संघटना हवी.सर्वांना सामावून घ्या.एखादा शिक्षक दुस-या संघनेचा जरी असला तरीही त्याला मदत करा.

केलेली मदत वाया जात नाही. सर्वांना सुरक्षित आणि हवीहवीशी वाटणारी प्रेरणादायी आणि आदर्शवत संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना असा विश्वास सर्वांनाच वाटायला हवा,यासाठी सर्वांनी हिरहिरीने प्रयत्न करावेत.याकामी केवळ मीच नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही आपल्यासोबत असतील असा विश्वासही महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मा.ना.उदयजी सामंत यांनी दिला.यासाठी त्यांनी कोरोनाकाळात चाकोरी बाहेर जावून मदत करणा-या एका शिक्षकाला माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्याच्याशी प्रत्यक्ष मोबाईल द्वारे बोलून त्याला प्रोत्साहन देत त्याच्या पाठीशी खंबीरपणे कसे उभे राहिले याचा किस्सा उपस्थितांना सांगितला.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.दिलीप देवळेकर यांनी रत्नागिरी जिल्हयाचा समावेश आंतरजिल्हा बदलीमध्ये करण्यात यावा.जिल्हा बदली झालेल्यांना सोडावे.शिक्षण सेवक मानधनात वाढ करावी.शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे.जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचा-याचे वेळेवर होत असताना फक्त शिक्षकांच्या पगाराचा निधी शासनाकडून आलेला असताही दोन महिने विलंबाने पगार का होतो असा प्रश्नही आपल्या प्रास्ताविकात उपस्थित केला.याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र रणसे यांनीही शिक्षकांची व्यथा आपल्या मार्मिक आणि रांगड्या शैलीत मांडल्या मंचावरील मान्यवरांनी व उपस्थित सर्वांनीच त्याला उत्स्फूर्त दाद दिली.
रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर तालुक्याच्या कार्यकारिणीही यावेळी जाहीर करण्यात आल्या. आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त,शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तम यश मिळविल्या बद्दल, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसह विद्यार्थी,शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमस्थळी सुंदर लक्ष्यवेधी रांगोळी श्री.विष्णू सागवेकर आणि त्यांची पत्नी सौ.अनुजा सागवेकर यांनी रेखाटली होती.या कार्यक्रमाचे सुंदर आणि नेटकं सूत्रसंचलन संजय बैकर केले आणि आभार संतोष आंबवकर यांनी मानले.

 महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कृतज्ञता व गुणगौरव समारंभ ,मराठा भवन,रत्नागिरी येथे 29/04/2022 रोजी संपन्न झाला.प्रमुख उदघाटक व अतिथी मा.ना.उदयजी सामंत साहेब,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा ,मा.श्री.महेश उर्फ बाबूशेठ म्हाप,उपजिल्हाप्रमुख शिवसेना रत्नागिरी,मा.श्री.प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी,मा.नगराध्यक्ष रत्नागिरी नगरपरिषद तथा रत्नागिरी तालुकाप्रमु रत्नागिरी  सेना जिल्हाध्यक्ष व प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक मा.श्री.दिलीप देवळेकर,जिल्हा सरचिटणीस श्री.सुरेंद्र रणसेआदी मान्यवर व मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!