मावळसामाजिक

भाजेतील काही महिला, शालेय विद्यार्थीनी , विद्यार्थी मोरीतून करतात धोकादायक प्रवास..

Spread the love

भाजेतील काही महिला, शालेय विद्यार्थीनी , विद्यार्थी मोरीतून करतात धोकादायक प्रवास..Some vegetable women, school students, students make a dangerous journey through the moor..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, २५ ऑगष्ट..

भाजेतील काही महिला , शालेय विद्यार्थीनी , विद्यार्थी पाणीपातळी वाढलेल्या द्रूतगतीमार्गाच्या खालील मोरीतून धोकादायक प्रवास करत असतात.मळवली रेल्वेगेट जवळून भाजे , पाटणला जा ये करण्यासाठी एक ओव्हरब्रीज असून उन्हाळ्यात पाऊस नसताना काही लोक येथे जा ये करतात.
पण आता पावसाचे पाणी साचल्याने येथे पाणी साचून रस्ता निसरडा झाला आहे, त्यामुळे येथून जा ये करणे धोकादायक असल्याने लोक येथे प्रवास करताना दिसतात.

गतवर्षी एका वयस्कर व्यक्तीला या मोरीतून पाण्यातून जाताना अपघात झाला होता.ती व्यक्ती या अपघातात दगावली होती.तसेच एक महिला पडून जखमी झाल्याने गंभीर जखमी होऊन सहा महिने आजारी होती.भाजे येथील विद्या प्रसारिणी सभेच्या शाळेत शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी रोज ओव्हरब्रीजचे वरून शाळेत जा ये करतात,पण काही विद्यार्थी, विद्यार्थीनी माञ या अरूंद मोरीतून पाण्यातून जाण्याचे धाडस करतात, पण ते जिवावर बेतण्याची शक्यता असल्याने विद्यार्थीनी व विद्यार्थी यांनी जावून जीव धोक्यात घालू नये, असे येथील स्वराज्य नगरीचे रहिवाशी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!