ताज्या घडामोडी

कलाशिक्षक विलास चौगुले यांचे फलक लेखन शैक्षणिक वर्तुळातील आकर्षण… शिवजयंती निमित्ताने साकारलेले शिवराज्याभिषेक सोहळ्याचे फलकचित्र ठरतय लक्षवेधी

Spread the love

सोशल मीडियावर प्रचंड दाद

माणसाला सगळ्याच प्रयत्नात यशाची हमी असतेच असे नाही. यश एक क्वचित भेटणार उंबराचं फूल आहे. पण त्यासाठी झाड मात्र जीवापाड जपावं लागतं त्याप्रमाणे आपल्या जवळ असणाऱ्या कलेची प्रामाणिकपणे जपणूक आणि साधना करून कलाक्षेत्रात नाव मिळवणारे विलास चौगुले यांची फलकचित्रे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र चर्चेत आहेत. सध्या शिवजंयती निमित्ताने साकारलेली शिवरायांचे फलकचित्र कलेचा अप्रितम नमूना ठरले आहे.

 

आरळा (ता. शिराळा) येथील गांधी सेवाधाम विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असणारे विलास चौगुले शाळेत होणारे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे नित्यनेमाने फलक लेखन करत आहेत. या फलक लेखनाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक संदेश, सुभाषिते, प्रेरणादायी यश मिळवणाऱ्याना शुभेच्छा, श्रद्धांजली, जनजागृतीपर संदेश अत्यंत सुबक सुंदर अक्षरात लिहून, शक्य असेल तिथे आकर्षक चित्रे काढून त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. साध्या फलकावर साध्या खडूने केलेल्या अप्रतिम फलक लेखनाला सोशल मीडियावर प्रचंड दाद दिली जात आहे. शिवजंयती निमित्ताने त्यांनी शिवरायावरील मातृसंस्कार ( बालाशिवाजी ) व राज्याभिषेक सोहळा हे फलकचित्र सर्वांचे आकर्षण व सर्वांचा कौतूकाचा विषय झाला आहे

चौगुले यांचे सुंदर फलक लेखन अनेकांचे स्टेटस बनू लागले आहेत. तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन रावत यांना शाळेमार्फत दिलेल्या श्रद्धांजलीच्या फलक लेखनाचा तर शेकडो युजर्सनी स्टेटस ठेवला होता. या फलक लेखनात त्यांनी बिपिन रावत यांची हुबेहूब प्रतिमा रेखाटली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने रेखाटलेले फलक लेखन व डॉ. आंबेडकर यांची हुबेहूब काढलेली प्रतिमा व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया वरून खूप दाद देऊन गेली .

आपल्या कले विषयी बोलताना विलास चौगुले म्हणाले माझे वडील मैदानी खेळ खेळायचे, नाटकामध्ये काम करायचे,मातीच्या छोट्या मोठ्या मूर्ती बनवायचे, अशिक्षित असूनही त्यांच्यात मला कलाकार दिसायचा त्यांचा माझ्या जीवनावर प्रभाव पडला पाचवीत असताना वडील वारले मात्र त्यांच्यातील कलाकार माझ्या रूपाने जिवंत ठेवायचा मी त्याच वेळी निर्धार केला. पुढे शालेय शिक्षण पूर्ण करत कलाविश्व विद्यालयात ए.एम. पदवी मिळवून गेल्या तीस वर्षापासून कला क्षेत्रात कार्यरत आहे.

विलास चौगुले यांनी आपल्यासारखे अनेक कलाकार विद्यार्थी घडवले आहेत. डोंगरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात यश मिळवता यावे म्हणून त्यांनी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करून आरळा येथेच शासकीय रेखाकन केंद्र मंजूर करून घेतले आहे. आज अनेक विद्यार्थ्यांना या केंद्राचा फायदा होत आहे. ते महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष म्हूणूनही काम करत आहे.

चौगुले यांच्या फलक लेखना चे अनेकांनी संग्रह करून उपक्रम बनवले आहेत. सुंदर हस्ताक्षर हा एक दागिना असतो. दागिना सर्वांनाच हवाहवासा वाटतो. अगदी त्याच प्रमाणे थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथी शैक्षणिक कार्यक्रम आले की विलास चौगुले यांचे फलक लेखन कधी एकदा सोशल मीडियावर व्हायरल होते. व ते पाहायला मिळते याची वाटच शैक्षणिक वर्तुळात पाहिली जात आहे. या कामी त्यांना शिक्षण संस्थचे चेअरमन आर . व्ही . हसबनीस , अध्यक्ष वैजनाथ महाजन , सचिव बं. चिं. दिगवडेकर , सर्व संचालक व मुख्याध्यापक आर. एस. हसबनीस , सर्व शिक्षक कर्मचारी यांचे प्रोत्साहन व सहकार्यं लाभत आहे. दिवंगत चेअरमन एस. व्ही . हसबनीस यांचेही त्यांना प्रोत्साहन व सहकार्य लाभत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!