ताज्या घडामोडी

टी व्ही आणि मोबाईल च्या अतिरेकाने थिजलेली पाऊले वाचनालयांकडे वळविणे काळाची गरज – संजय पाटील

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / सुजाण आणि बलशाली पिढीसाठी सकस वाचन आवश्यक आहे असे प्रतिपादन व्याख्याते संजय पाटील यांनी केले. ते येथील तरुण मित्र मंडळ तालुका वाचनालयात आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सुनील हसबनीस कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.
संजय पाटील म्हणाले , आज वाचन कमी झाल्याबाबत सगळीकडे बोलले जात असले तरी हे खरे नाही . व्हाट्सअप , फेसबुक यासारख्या समाज माध्यमांवर वाचकांची संख्या लक्ष्य वेधी आहे. पण या समाज माध्यमांवरील लिखाणाची विश्वासार्हता आणि दर्जा याचा विचार करता पुस्तक वाचनाशिवाय तरणोपाय नाही. यासाठी पुस्तकप्रेमी युवा पिढी तयार करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे.
प्रारंभी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष सुनील हसबनीस यांनी केले. ग्रंथपाल प्रतापराव शिंदे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष सुनील हसबनीस , उपाध्यक्ष दिनेश हसबनीस , कोषाध्यक्ष संतोष देशपांडे , ग्रंथपाल प्रतापराव शिंदे , लेखनिक मकरंद अष्टेकर , राजू कुलकर्णी , सोनटक्के , सेवानिवृत्त मुख्याध्यापक पा. ना. जोशी यांच्यासह वाचकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. आभार ग्रंथपाल प्रतापराव शिंदे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!