महाराष्ट्र

रोहित पाटील यांच्या खांद्यावर पक्ष देणार लवकरच मोठी जबाबदारी ; राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले संकेत

मुंबई : कवठेमहाकाळ नगरपंचायत निवडणुकीत मोठा विजय मिळवणाऱ्या रोहित पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष लवकरच मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले आहेत.

कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनीदेखील नगरपंचायत निकालानंतर रोहित पाटील यांचे अभिनंदन करत त्यांना पक्षातील मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे सूतोवाच केले होते.

अवघ्या तेवीस वर्षाच्या रोहित पाटील यांनी कोठे महाकाळ नगरपंचायतीची सत्ता एकहाती काबीज केली.त्यामुळे राजकीय वर्तुळात रोहित पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आर आर पाटील यांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा पाच अनेक वर्षे सांभाळलेली होती. राज्यात राष्ट्रवादीला सक्रीय करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. तासगाव कवठेमहांकाळ या विधानसभा मतदार सघाचा रोहित पवार यांच्याकडे उदयोन्मुख नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये