ताज्या घडामोडी

अभाविपच्या वतीने आळेफाटा या ठिकाणी लावण्या प्रकारणाबाबदत निदर्शने

Spread the love

नगर प्रतिनिधी :
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आळेफाटा शहराच्या वतीने मा. बाळासाहेब जाधव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आळे, या ठिकाणी तमिळनाडू राज्यातील तंजावर येथे 17 वर्षीय लावण्या नावाच्या विद्यार्थिनीस जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे त्या विद्यार्थीनीने त्रासाला कंटाळून आत्महत्या केली तसेच या घटनेचा चेन्नई या ठिकाणी अभाविपच्या राष्ट्रीय महामंत्री सुश्री निधीजी त्रिपाठी या शांततेच्या मार्गाने लावण्याला न्याय मिळण्यासाठी आंदोलन करत होत्या तरीही तेथील सरकारने त्यांना अटक केली या घटनेचा निषेध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व आळेफाटा शहर सर्व कार्यकर्ते व व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी जाहीर निषेध नोंदवत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी न्याय द्या न्याय द्या लावण्याला न्याय द्या, जस्टीस फॉर लावण्या, फाईट फॉर लावण्या, तमिळनाडू सरकारचा जाहीर निषेध अशा जोरदार घोषणा दिल्या व लावण्याला न्याय द्या अशी मागणी केली. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तर पुणे जिल्हा संयोजक व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेश पाडेकर यांनी लावण्याला न्याय मिळावा यासाठी आपल्या मतांमधून मागणी केली. तसेच विद्यार्थिनी निकिता मटाले हिने मत व्यक्त केले, यावेळी शहर मंत्री संचित चव्हाण, दीपक दिवेकर, सुरज जाधव, सिद्धांत कुऱ्हाडे, किशोर बोऱ्हाडे, दिव्या पादिर, आकांशा शिंगोटे, पौर्णिमा वामन, दिव्या शिंगोटे, शुभांगी हांडे, प्रणाली तांबे, दिव्या शिंदे, पुनम काळे, पायल तांबे, तसेच अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती व सहभाग होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!