ताज्या घडामोडी

चेंबूरमध्ये मराठी सुंदर शुद्धलेखन स्पर्धा परिसरातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Spread the love

मुंबई -साहित्यिक, विचारवंत, लेखक, जेष्ठ कविवर्य कुसुमाग्रज जेष्ठ नाटककार,अभिनेता वि.वा.शिरवाडकर यांच्या जन्म जयंतीच्या मराठी भाषा दिनानिमित्त चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील शिवसेना शाखा क्रमांक १५३ च्यावतीने स्थानिक लोकप्रिय नगरसेवक आणि बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर व समाजसेविका मीनाक्षी पाटणकर यांच्या तर्फे मराठी सुंदर शुद्धलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत तीन गटात स्पर्धा घेण्यात येऊन बक्षिस पात्र विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी परिसरातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद दिसून आला.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जेष्ठ चित्रकार सुरेश पाटील आणि सीमंतिनी खोपकर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमास उपस्थित विधान सभा संघटक अविनाश राणे,शाखा प्रमुख उमेश करकेरा महिला शाखा संघटक अनिता महाडिक, राजाराम मोरे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते. नागरिक स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!