ताज्या घडामोडी

संकल्प फाउंडेशनच्या वतीने आदित्य यादव याचा सत्कार

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

संकल्प फाउंडेशन शिराळा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संत गाडगे महाराज संस्कृती भवन शिराळा येथे कु. आदित्य सत्यजित यादव शिराळा यांने इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हा यादीत १३६ वा (ग्रामीण विभाग) उत्तुंग यश मिळाल्याबद्दल संकल्प फाउंडेशनच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन संत गाडगे महाराज पतसंस्थेचे संचालक रमेश यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवि यादव, पतसंस्थेचे सल्लागार वायसिंग बिळसकर हे प्रमुख उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक गणेश यादव यांनी केले.

संकल्प फाउंडेशन या संस्थेचे कार्यक्षेत महाराष्ट्र राज्य असून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, कृषी, क्रिडा, संस्कृतीक, व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असलेल्याची माहिती दिली. व फाउंडेशन मार्फत विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे गणेश यादव यांनी सांगितले.

यावेळी फाउंडेशनच्या वतीने महिला साठी हळदी-कुंकू समारंभ घेण्यात आला होता मोठ्या संख्येने महीला उपस्थित होत्या.
यावेळी फाउंडेशन उपाध्यक्ष सुभाष कदम, सचिव महादेव परिट, खजिनदार अविनाश यादव, संचालक सुभाष दळवी, वैभव तेली, सुयोग यादव, रविंद्र यादव, तसेच पतसंस्थेच्या संचालिका गौरी यादव, मृदुला यादव, नीलम कदम, लता यादव, रेखा परीट, सोनाली यादव, तुप्ती यादव, अर्चना यादव, वासंती यादव, सुशिला रसाळ, वर्षे यादव तसेच मान्यवर व महिला उपस्थित होत्या. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवि यादव यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!