ताज्या घडामोडी

श्री दत्त पतसंस्था गोरख चिंचेचे संगोपन करत आहे,हि बाब कौतुकास्पद – हणमंत गायकवाड

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर ने शिराळा येथील भुईकोट किल्ला परिसरात असलेल्या गोरखचिंचे च्या झाडाला दत्तक घेऊन संगोपन करीत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. या झाडाला शोभेल असा प्रशस्त कट्टा बांधलेने याच्या सौंदर्यात भर पडली आहे. असे प्रतिपादन भारत विकास ग्रूप (BVG) चे संस्थापक हणमंत गायकवाड यांनी केले.
ते आज शिराळा येथे खाजगी दौऱ्यावर आले होते. प्रारंभी डॉ. प्रफुल्ल काकडे यांनी स्वागत केले. यावेळी पतसंस्थेचे संचालक दिनेश हसबनीस यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. तर प्रहार संघटनेचे बंटी नांगरे यांनी भुईकोट किल्ला व परिसराची ऐतिहासिक महत्त्व सांगितले. येथे किल्ला परिसर स्वच्छता अभियानाची माहिती दिली.
आज दिवसभरात गायकवाड यांनी येथील समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या अकरा हनुमान पैकी एक हनुमान मंदिर, श्री गोरक्षनाथ मंदिर, ग्रामदैवत अंबामाता मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले.
या वेळी प्रमोद काकडे, डॉ. साईनाथ पाटील, अशोक कदम, डॉ. प्रतिक काकडे, डॉ. अनिरुद्ध काकडे, रत्नाकर कुंभार, मारुती सावंत आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!