आपला जिल्हा

चैञी याञेसाठी आलेल्या भाविकांत किरकोळ कारणावरून मारामारी ; एका भाविकाचा खून , एक गंभीर जखमी 

लोणावळा : चैञी याञेसाठी आलेल्या भाविकांत किरकोळ कारणावरून मारामारी ;एक भाविकाचा खून झाला आहे;तर एकजण गंभीर जखमी झाला आहै. मनोज कुंडलीक पाटील (वय-४९,रा-कोपरी, ठाणे ) असे मृताचे नाव आहे. यात हर्षल चंद्रकांत पाटील (रा-कोपरी , ठाणे ) हे गंभीर जखमी झाले आहेत.

फिर्यादी राहुल भास्कर पाटील (रा-कोपरी , ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञात चार आरोपी विरोधात लोणावळा ग्रामिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटलृली घटना अशी : श्री एकविरा देवीच्या चैञीयाञेच्या मुख्य दिवशी ता.९ पहाटे १ चे सुमारास वेहेरगावचे पायथा मंदिरात श्री. एकविरा जोगेश्वरी मंदिराचे समोरचे रस्त्याचे विरूद्ध बाजूला गावतळ्याचे बाजूला मुक्कामी राहिलेल्या मयत व जखमी यांचे ग्रूपमधील कार्तिक प्रकाश म्हाञे यांचा मोबाईल चोरीला गेला.यावेळी शेजारी असणाऱ्या व्यक्तीला मोबाईल तुम्ही घेतला का ? असे विचारले असता , त्याचा राग येवून दोन गटात भांडणे झाली. त्यातील आनोळखी व्यक्तीमधील एकाने मनोज पाटील यांचे छातीवर त्तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून केला.तसेच त्यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरिक्षक प्रविण मोरे यांचे मार्गदर्शनासाठी पोलिस उपनिरिक्षक सचिन बनकर यांनी खुनाचे घटनेचा पंचनामा करून मृतदेह खंडाळा येथे उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. .चार अज्ञात आरोपींवर भा.द.वि.कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये