महाराष्ट्र

ज्ञान व संवाद कौशल्याशिवाय आयुष्यात यशस्वी होता येणार नाही ः व्याख्यात्या प्रा. राधिका कुट्टी

आपल्या मातृ भाषेबरोबरच जागतिक मान्यता मिळालेल्या इंग्रजी भाषेवर देखील प्रभुत्व मिळवा.

देहबोली, ज्ञान व संवाद कौशल्याशिवाय आयुष्यात यशस्वी होता येणार नाही ः व्याख्यात्या प्रा. राधिका कुट्टी
चिंचवड  ः चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसाठी व्याख्यात्या मितीला शहा यांचा व्यक्तिमत्व विकास व व्याख्यात्या प्रा. राधिका कुट्टी यांची मुलाखतीला सामोरे जाताना घ्यावयाची काळजी या विषयावर दोन सत्रात कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्रा. स्नेहल वर्‍हाडी, प्रा. रिबेका साबळे, प्रा. ऋषिकेश चिकणे, प्रा. मिहीर जगताप आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्याख्यात्या मितीला शहा म्हणाल्या, “तुम्ही जे ध्येय ठरविले आहे ते पूर्ण करण्यासाठी त्याची सुरुवात स्वतःपासूनच करावी, आपली जबाबदारी इतरांवर लादू नका. चांगल्या सवयी अंगिकारा दिवसाच्या दिनचर्याचे वेळापत्रक ठरवा, आळस झटकून कामे वेळच्या वेळेवर पूर्ण करा. स्वतःचा स्वतःवर आत्मविश्वास असेल तर काहीही अशक्य नसते, त्यासाठी प्रयत्नशिल राहून नाविन्यांची कास अंगिकारा दुसर्‍यांच्या चुका काढण्यापेक्षा स्वतःच्या चुका शोधून त्यावर मात करा संवादातून माहिती प्राप्त करता येते, यासाठी आपापसात संवाद करा, असे आवाहन केले.”
दुसर्‍या सत्रात विद्यार्थ्यांनी पदवीग्रहन केल्यानंतर नोकरीसाठी मुलाखतीला सामोरे जाताना घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन करताना व्याख्यात्या प्रा. राधिका कुट्टी म्हणाल्या, प्रत्येक आई-वडीलांचे स्वप्न असते आपला पाल्य त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हावा. शिक्षणासाठी प्रसंगी पदरमोड करून आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी जागृत राहून आपले कर्तव्य पूर्ण करतात. विद्यार्थ्यांनी देखील आपली जबाबदारी ओळखून आपल्या आई-वडीलांचे स्वप्न व स्वतःचे ध्येय प्राप्त करण्यासाठी शिक्षकांकडून ज्ञानप्राप्ती करून पदवी प्राप्त करावी. परंतु, आजच्या जीवघेण्या स्पर्धेत नोकरीसाठी मुलाखत घेणार्‍या विविध उद्योग समुहातील मनुष्यबळ विभागातील अधिकार्‍यांना अपेक्षित उमेदवारांची निवड करताना काय अपेक्षा असतात. त्याबाबत मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनो ज्ञानप्राप्ती, देहबोली, उत्तम संभाषण कौशल्याची हातोटी, स्वतःचा आत्मविश्वास विचारलेल्या प्रश्नांची अचूक नेमक्या शब्दात त्यांना अपेक्षित उत्तरे दिली तरच, आयुष्यात यशस्वी होता येईल. आपल्या मातृ भाषेबरोबरच जागतिक मान्यता मिळालेल्या इंग्रजी भाषेवर देखील प्रभुत्व मिळवा, मुलाखतीला जाताना आपला पोशाख सौजन्यशील, भाषा स्वतःचा आत्मविश्वास विचारण्यात आलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली तर, मुलाखतीसाठी यशस्वी व्हाल व भविष्यात उत्तम आयुष्य जगता येईल. लक्षात ठेवा मुलाखतीला निमंत्रण मिळणे ही सोनेरी संधी असते. मुलाखत घेणार्‍यांसमोर फाजील आत्मविश्वास दाखवता कामा नये. स्वतःचा प्रभाव त्यांच्यासमोर कसा पडेल. या बाबींकडे लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. समोरची व्यक्ति काय बोलते हे ऐकण्याची सवय अंगिकारा यासाठी वाचन, चिंतन, शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी अधिक वेळ द्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहित आकोलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तृप्ती महांबरे यांनी तर, आभार प्रा. गीतांजली ढोरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये