क्रीडा व मनोरंजन

मुंबई उपनगर कबड्डी उद्यापासून

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, आजपासून मुंबई उपनगर कबड्डी असो. च्या जिल्हा अजिंक्यपद चाचणी कबड्डी स्पर्धेला सुरवात. संदेश स्पोर्ट्स.क्लब. विरुद्ध आर्यन. वॉरियर्स, सुयश. कला. क्रीडा. केंद्र. विरुद्ध व्ही.पी. म. घाटकोपर यांच्यातील लढतीने “३९व्या मुंबई उपनगर कबड्डी असो. च्या जिल्हा अजिंक्यपद चाचणी कबड्डी स्पर्धेतील संघर्षाला प्रारंभ होईल. किशोर/किशोरी, कुमार/कुमारी, ब गट स्थानिक व व्यावसायिक गट अशा विविध प्रकारात ही स्पर्धा खेळविण्यात येईल. पश्र्चिम विभागाकरिता प्रज्ञा क्रीडा मंडळ, शांताराम तलाव, मालाड येथे दि.२६मार्च रोजी सकाळी ९-०० वाजता यास्पर्धेचे उदघाटन करण्यात येईल. तर पूर्व विभागाकरिता त्याच दिवशी (२६मार्च) सायं. ६-०० वाजता अमरज्योत क्रीडा मंडळ – घाटकोपर व सत्यम सेवा मंडळ-कांजूर मार्ग अशा दोन ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका तयार असून ती स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व संघांनी कार्यालयातून घेऊन जावी. या सर्वांची नोंद संलग्न संघांनी घ्यावी व स्पर्धेकरिता वेळेवर उपस्थित राहून असो.ला सहकार्य करावे. असे आव्हान या पत्रकाद्वारे मुंबई उपनगरचे सरचिटणीस प्रताप शेट्टी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!