आपला जिल्हा

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्यावतीने बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन .

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्यावतीने बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

तळेगाव दाभाडे,
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्यावतीने येत्या 15 मे ते 25 मे दरम्यान बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सेवाधाम वाचनालय येथे 11 ते दुपारी 4 या वेळेमध्ये होणार असल्याची माहिती शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी दिली.
या बाल व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये प्रसंग नाट्य, नाट्यछटा, नृत्य, मुलाखतीचे तंत्र आणि मंत्र, संगीत कथाकथन, पपेट शो, हस्तकला, खेळ, चित्रकला, निर्णयक्षमता, माइक वरील संभाषण, समस्या निवारण, ऑनलाइन ब्लॉगिंग आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते गणेश काकडे उपस्थित राहणार आहेत. या बाल व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये जास्तीत जास्त बालकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन धोत्रे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये