ताज्या घडामोडी

उरूण इस्लामपूर शहर व उपनगरातील नविन मालमत्ता धारकांना आवाहन – मा.शकिल सय्यद (भैय्या) शिवसेना शहर प्रमुख उरूण इस्लामपूर

Spread the love

उरुण-इस्लामपूर शहर, उपनगरातील मालमत्ता धारकांना या माध्यमातून एक शिवसैनिक म्हणुन आवाहन करतो चालु वर्षी आपल्या कडे जवळ पास 1200 नव्याने घर बाधंण्यात आली आहेत. पालिका प्रशासनाने यांचा सर्वे करुन नोव्हेंबर, डीसेबंर दरम्यान या सर्व मालमत्ता धारकांना संकलित कराची नोटीस दिली होती.

 

ही संकलित कर आकारणि अव्वाच्या सव्वा असल्याने मालमत्ता धारकांनी पालिका ॲक्ट तरतुदी नुसार ही संकलित कराची आकारणी मान्य नसल्याचे लेखि तक्रार दीलेली होती. यावर नगररचना सांगली याची सुनावणी घेऊन मगच पक्के बिल वाटप करने. कायदेशीर उचित होत. ही सुनावणी डिसेंबर मधे झाली आहे. असं कर अधिकारी मा.सतिश दंडवते यांनी बोलताना सांगितले. ही नगररचना सांगली यांनी हे पहले अपील फेटाळल्या नतंरच आम्ही पक्की बिल वाटप सुरू केले आहे .
मालमत्ता धारकांना मी विनंती करतो ज्या,ज्या मालमत्ता धारकांना पक्के बिल मिळालं आहे त्यांनी १००% टक्के रक्कम बिल मिळाल्या पासुन 30 दिवसांच्या आत भरुन त्या सोबत पालिका ॲक्ट कायद्या नुसार दुसरे आपिल आर्ज पालिकेला द्या अर्जाला ५ रु कोर्ट फी टिकीट लावुन त्याची पोच घ्या ,त्याच बरोबर सोबत आपिल अर्ज फी पालिकेकडे ५ रु रोख भरून तशी पावती घेणं आवश्यक आहे. ती घ्यावी ही मालमत्ता धारकांना या माध्यमातून मी आवाहन करतो.
आपला अपील आर्ज स्विकारत नसतील किंवा अपील फी भरुन घेवुन त्याचि पावती देण्यास नकार दिला तर शिवसैनिक म्हणून माझ्या शी सम्पर्क करा या 1200 नविन मालमत्ता धारकांना शासन नियमानुसार ज्यानि बांधकाम परवानगी घेतली नाही अशा मालमत्ता धारकांना शास्ती कराची आकारणी केली आहे.
परंतु ज्या मालमत्ता धारकांनी 600 सक्वेर फुटा पर्यंतच बांधकाम केले आहे अशा मालमत्ता धारकांना हा शास्ति कर लावता येणार नाही. त्यामुळे ज्याचें बांधकाम 600 सक्वेर फुट किंवा त्या पेक्षा कमी आहे अशा मालमत्ता धारकांना जर शास्ति कर लावला असेल तर तो अन्याय कारक आहे ही प्रशासकांचा मनमानी खपवुन घेतली जाणार नाही. अशा सर्व मालमत्ता धारकांनी माझ्याशी सम्पर्क साधावा असे आवाहन करतो.

शकील आदम सय्यद (भैय्या)
शिवसेना शहरप्रमुख उरूण-इस्लापूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!