ताज्या घडामोडी

धनटेक पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक बिनविरोध.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

मांगले (ता. शिराळा) येथील विलासराव पाटील धनटेक पाणीपुरवठा संस्थेची पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध झाली. या संस्थेवर सातत्याने आमदार मानसिंगराव नाईक यांच्या विचाराच्या मंडळींची सत्ता कायम आहे. नूतन संचालक मंडळींनी आज चिखली (ता. शिराळा) येथे येवून आमदार मानसिंगभाऊंची सदिच्छा भेट घेवून त्यांचा सत्कार केला. नूतन संचालक मंडळास मी शुभेच्छा दिल्या. यावेळी नूतन संचालक सत्यम विलासराव पाटील, श्रीकांत आबा पवार, दिपक हिंदूराव पाटील, डॉ. सतिश निळकंठ पाटील, पांडुरंग हिंदूराव चौगुले, नारायण दत्तात्रय चरापले, प्रदिप वसंत कालेकर-देसाई, संजय विठ्ठल मस्के, पुष्पाताई शिवाजी दिवे, मनिषा सतिश पाटील, रमेश मारुती मोहिते, आबा विश्राम गावडे, एकनाथ श्रीपती कुंभार हे संचालक तर, पोपट बाबुराव काटकर व सुधाकर आकाराम चौगुले हे स्विकृत तज्ञ संचालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!