ताज्या घडामोडी

कडेगाव तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस आढावा बैठक सम्पन्न

Spread the love

प्रतिनिधी / कडेगाव येथे कडेगाव तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीची आढावा बैठक आज संपन्न झाली. प्रदेशचे निरीक्षक अरुण असबे सांगली जिल्हा परिषदेचे गटनेते शरदभाऊ लाड, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवती जिल्हाध्यक्ष पूजाताई लाड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयदीप यादव, महिला अध्यक्षा वैशालीताई मोहिते, युवक अध्यक्ष विराज पवार, कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे, युवती तालुकाध्यक्ष स्नेहल कदम, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष वैभव देसाई, विद्यार्थी तालुकाध्यक्ष अथर्व खाडे, विद्यार्थी शहर अध्यक्ष हरी हेगडे, कडेगाव शहर अध्यक्ष प्रवीण करडे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत कार्यकारणीच्या कामकाजाचा आढावा घेतला. राबविलेले उपक्रम, आगामी काळातील नियोजन, पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबुत करणे आदीबाबात चर्चा झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!