ताज्या घडामोडी

नागरिकांना उचलला राजेश नाईक यांच्या प्रचाराचा भार..

Spread the love

कोल्हापूर (वर्षाराणी दुर्गे-सरुडकर)

शरद जोशी व रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हा संघटक, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार राजेश उर्फ बाळ नाईक यांना सर्वसामान्य नागरिकांना एक, एक रुपया जमवून त्यांच्या प्रचाराला हातभार लावला आहे. सामान्यातील सामान्य नागरिकांनी नाईक यांची प्रचार यंत्रणा हातात घेतली आहे. माझ्यासारख्या गरीब सर्वसामान्य कार्यकर्त्याला शेतकरी संघटनेने उमेदवारी देऊन कोल्हापुरातून क्रांतीची मशाल पेटवल्याची भावना शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेश नाईक यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी इतर पक्षांना लक्ष न करता सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन ते मैदानात उतरले आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्नाला त्यांनी हात घातला आहे. शेतकर्‍यांच्या मालाची निर्यात वाढवणे व शेतकर्‍यांना आर्थिक पाठबळ देण्याचा मनोदय व्यक्त केली आहे. दोन महिन्यांपासून निवडणूक लढवण्याचा दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. आगामी कोल्हापूर महापालिका निवडणूक संघटना लढवणार आहे. या निवडणुकीसाठी महिला व तरूण वर्गाला संधी दिली जाईल असे ते म्हणाले.शेतकरी संघटनेचा अजेंडा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे. गेली 35 वर्षे झाली विद्यार्थी दशेपासूनच समाजसेवेचा घेतलेला वसा आजही कायम आहे आणि पुढेही तो चालू राहणार आहे. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चळवळ सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले एक माॅडेल म्हणून कोल्हापूर उत्तर विधानसभा संघाच्या पोटनिवडणुकीकडे संघटनेने बघीतले आहे. महाराष्ट्रावर या नवीन मॉडेलचा फरक पडेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.काही बॅका व्यापा-यांना त्रास देत आहेत या प्रश्नाकडे लक्ष्य घालून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रातील व्यापारी कर्नाटक राज्य जात आहेत. व्यापा-यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यांना येथेच थांबवण्याची दक्षता घेतली जाईल. उद्योग धंदे कसे वाढतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर उद्योग धंद्याचा हब तयार व्हा यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीकडे बारीक लक्ष्य ठेऊन आहेत. सोमवारपासून प्रचारासाठी यंत्रणा कामाला लागणार आहे. एक नवी वाट चोखळण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. कोल्हापुरची सुज्ञ मतदार आपल्याला विधान सभेवर पाठवून कोल्हापूरही राजर्षी शाहूंची नगरी असल्याचे दाखवून देतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!