आरोग्य व शिक्षण

वराळे रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य ; भटक्या कुत्र्यांचा त्रास

Spread the love

वराळे : येथील ग्रामपंचायत हद्दीतील वराळे फाट्यापासून आंबीपुलाकडे जाणारा रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. आंबी पूल तुटल्यापासून या मार्गावर स्थानिक नागरिकांशिवाय इतरांची रहदारी बंद आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे – झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांनी रस्त्याच्याकडेला टाकलेला कचरा काही ठिकाणी अर्ध्या रस्त्यावर पसरला आहे. त्यामुळे या रस्त्याने पायी चालणे अवघड झाले असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

ग्रामपंचायतमार्फत कचरा संकलनासाठी रोज घंटागाडी येत असली तरी काही बेजबाबदार नागरिक रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांचाही मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. तर काही सोसायट्यांचे सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरून रोगराई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

या रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्याचे नियोजन करून घंटागाडी रोज येऊनही रस्त्यावर कचरा टाकणा-यावर आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

याबाबत ग्रामपंचायत सरपंच मनीषा शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता येथे कचरा उचलण्यासाठी रोज ट्रॅक्टर जातात. ग्रामपंचायतीच्या वतीने एक भरारी पथक नेमून कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!