क्राईम न्युज

इस्लामपुर पोलीस स्टेशच्या रात्रगस्तीला असणाऱ्या पोलीस पथकाच्या सर्तकतेमुळे टॅक्टर चोरट्यास टॅक्टरसह अवघ्या एका तासात केले जेरबंद”

Spread the love

पोलीस अधिक्षक सो श्री. दिक्षीतकुमार गेडाम साहेब व मा. अप्पर पोलीस अधिक्षक सी. मनिषा डुबुले मॅडम यांनी चोरी, घरफोडी, जबरीचोरी अश्या प्रकारचे गंभीर गुन्हे उघडकिस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे मा. श्री कृष्णात पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपुर व श्री शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक, इस्लामपुर पोलीस ठाणे यांनी रात्र गस्तीला हत्यार बंद पोलीस पथके नेमली आहेत. त्याप्रमाणे इस्लामपुर पोलीस ठाणे हद्दीत दि.२७ रोजी रात्रगस्त करीता असणारी पोलीस गाडी दि. २८ रोजी पहाटे ०२.०० वाजता ताकारी गावात पेट्रोलिंगला आली असता त्याठिकाणी फिर्यादी नामे श्री. अभिजीत चंद्रकांत मोरे रा. रेठरे हरणाक्ष यांचे ताकारी गावातील मित्राच्या पत्र्याचे शेड मध्ये  ८०,०००/-रु किमतीचा एक पॉवर ट्रक कंपनीचा निळ्या रंगाचा टॅक्टर हा त्यांनी एक तासा पुर्वी लावलेला होता. तरी तो दिसुन येत नसल्याने चोरीस गेला असलेबाबत रात्रगस्तीचे पोलीसांना सांगितलेने रात्र गस्तीला ताकारी येथे गेलेले पोलीस गाडीतील पोलीस / हवलदार दिपक भोसले यांनी रात्र गस्त करीता असलेले सर्व पोलीसांना टॅक्टर चोरी बाबत माहिती दिली व जागो जागी नाकाबंदी करुण शोध घेण्यास कळविले. त्याप्रमाणे इस्लामपुर शहर हद्दीत रात्र गस्त करीता असणारे बीट मार्शल हे शोध घेत असताना बीट मार्शल नंबर. १ चे पोना / अरुण पाटील व होमगार्ड / निखील पवार यांना बोरगाव ते जुनेखेड जाणाऱ्या रोड वरती पेट्रोलिंग करीत असताना जुनेखेड गावच्या दिशेने एक भरधाव वेगाने टॅक्टर गेल्याचे निदर्शनास असल्याने त्यांनी लागलीच सदर टॅक्टरचा चित्तथरराक पाठलाग करुन सदर टॅक्टर यास थांबवुन त्या टॅक्टर चालक याचे नाव विचारले असता त्याने अक्षय अशोक गोरवे वय २६वर्षे मूळगांव खंबाळे ता खानापूर सध्या रा. ताकारी असे सांगीतले व सदर टॅक्टर बाबत विचारणा केली त्यांने चोरुन आणलेची कबूली दिलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास ताकारी बीट अंमदार मपोहेकॉ/ मिनाक्षी माळी या करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री कृष्णात पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपुर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक, इस्लामपुर पोलीस ठाणे, इस्लामपुर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटिकरण शाखे कडिल सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रविण साळुंखे, चा. सपोफौ/ शशिकांत माने, पोहेकों/दिपक भोसले, पोहेकॉ/ ८१९ दिपक ठोंबरे, पोना/१७३३ अरुण पाटील, पोकॉ/ १३१७ आलमगीर लतीफ, होमगार्ड / निखील पवार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!