आरोग्य व शिक्षण

अथर्व हॉस्पिटल येथे महात्मा फुले योजनांचा लाभ घ्यावा- मिलिंद अच्युत

Spread the love

 

तळेगाव दाभाडे : येथील अथर्व ॲक्सिडेंटल हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा. अथर्व हॉस्पिटल येथे मोठ्या प्रमाणात महात्मा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून नोंदणीकृत करण्यात आल्या आहेत. आज पर्यंत अथर्व हॉस्पिटल यांनी चांगल्या प्रकारे आरोग्य विभागात कार्य केले असून ते अधिकाधिक बळकट व्हावे यासाठी गोरगरीब दारिद्र्यरेषेखालील आर्थिक मागासलेल्या रुग्णांनी अथर्व हॉस्पिटल येथे महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार घ्यावेत असे आवाहन मिलिंद अत्यंत यांनी केले आहे.

तळेगाव दाभाडे मध्ये फक्त दोनच हॉस्पिटल महात्मा फुले योजनेत काम करत असल्याने गोरगरीब रुग्णांना पिंपरी-चिंचवड व पुण्याकडे उपचारांसाठी पळावे लागते गोरगरीब रुग्णांना योजनांची माहिती नसते त्यामुळे त्यांना आजारपणात अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे अथर्व हॉस्पिटल हे अद्ययावत हॉस्पिटल असून महात्मा फुले योजनांचा गोरगरीब रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य सेवक मिलिंद अच्युत यांनी केले आहे अथर्व हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले योजने अंतर्गत खालील प्रकारचे उपचार होतात.

कर्करोग ,श्वसन रोग, सर्वसामान्य औषध उपचार, रक्तदोष व उपचार चिकित्सा व तपास, फिजिओथेरपी अतिदक्षता विभाग, संसर्गजन्य रोग, मूत्रपिंड अथवा किडनी संदर्भातील इलाज, मज्जातंतू संदर्भातील इलाज, सर्वसामान्य शस्त्रक्रिया, मेंदू मज्जारज्जू व चेतातंतू यांच्या रोगांवरील इलाज, कर्करोग आथवा कॅन्सर वरील इलाज, प्लास्टिक सर्जरी, शरीरावरील जखमा दुखापत कृत्रिम अवयव, कान नाक घसा यांच्या वरील उपचार, जननेंद्रिय व मूत्र मार्गावरील इलाज, इत्यादी मोठ्या प्रमाणातील आजारांवरील इलाज महात्मा फुले योजनेअंतर्गत केले जात आहेत.

सर्वसामान्य रुग्णांना महात्मा फुले योजना मध्ये कुठले कुठले आजार समाविष्ट केले जातात याचे ज्ञान नसते त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. अथर्व हॉस्पिटल मधील महात्मा फुले योजनांचा गोरगरीब दारिद्र्यरेषेखालील रुग्णांनी लाभ घ्यावा व इतर रुग्णांना देखील अधिकाअधिक माहिती करून द्यावी

अधिक माहितीसाठी आरोग्य सेवक मिलिंद अच्युत 9922859922
दिनेश भोसले
9922211152
शैलेंद्र साळुंखे
96739 00066
सचिन गोळे
9970501145
यांच्याशी संपर्क साधून महात्मा फुले जन आरोग्य योजना गोरगरीब व दारिद्र्य रेषेखालील गरजू रुग्णांना पर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य यज्ञात सहभागी होण्याचे आवाहन आरोग्य सेवक मिलिंद अच्युत यांनी केले आहे तसेच गोरगरीब रुग्णांचा पाठीमागे आरोग्य दूत म्हणून उभे राहणारे पवना हॉस्पिटल व स्पर्श हॉस्पिटल येथे महात्मा फुले जन आरोग्य योजना पुन्हा कार्यान्वयित करावी अशी मागणी आरोग्य सेवकांकडून करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!