ताज्या घडामोडी

आणि अमावस्येला मला देव दिसला .. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीची उभी राहीली गुढी 

Spread the love

भर अमावस्येचा दिवस ..दुपारची दोनची वेळ…. सूर्य आग ओकत होता. तज्ञांनी सांगितलेली उष्णतेची लाटेची तिव्रता जाणवत होती .. ऊन रणरणत होत. शरीराची लाही लाही होत होती. गुढी पाडव्याची तयारी करायची होती. पण अशा भर उन्हात मनात मात्र वेगळाच विचार घोळत होता. मनात आल अन् गाडी डोंगराकड , जंगलाच्या दिशेने वळाली. गरम झळा लागत होत्या. व अशा ऊन्हातून सात आठ किलोमिटर चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांलाही गाडीवर घेतले. त्या चालत शाळेपर्यंत पोहचणाऱ्यां मुलामध्ये मला .. ? काही किलोमिटरचा डोंगरावरचा प्रवास करत जंगल , डोंगरी भागात असणाऱ्या त्या वाडीत पोहचलो. प्रतिकूलतेशी झुंज देत शिक्षण घेणाऱ्यां सर्वं मुलांनी मी आलोय म्हटल्यावर माझ्या भोवती घोळका केला. नेहमी प्रमाणे सर्वं विद्यार्थ्यांना शैक्षणिक , मार्गदर्शन केले. कॅरमबोर्ड , बुद्धीबळ , दोरीउड्या काढल्या .. रणरणत्या उन्हातही .. विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य वाढले … चेहर्‍यावर समाधान झळकत होते.आनंदाने सगळे खेळात रममाण झाले. आज उत्सांहान खेळणाऱ्यां त्या डोंगरी भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये साक्षात मला देव दिसला. वाट्टल आता जाव घरी. पण गाडी दुसऱ्या वाडीच्या दिशेने पळू लागली. गावात पोहचताच सगळे युवक एकत्र आले. दुर्गम भागातील युवकांना उच्च शिक्षण , क्रीडास्पर्धा व पोलीस ,आर्मीभरती विषयी मार्गदर्शन केले त्या डोंगरावरच्या ज्ञानासाठी आसुसलेल्या निरागस नम्र , शांत , विद्यार्थ्यामध्येही साक्षात मला देव दिसला.
संध्याकाळ झाली सूर्य मावळीतला झुकलेला.. अंधार पडण्यास सुरवात झाली. गावच्या बाहेर डोंगर पठारावरील माळरानावर कुदळीने उकरून लांबउडीच्या खड्यात सराव व माळावरच्या त्या रानात पोलीस , आर्मी भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या त्या पोंराना भेटलो. प्रबोधन केल्यामूळे डोंगरी भागात खेळ पोहचल्याचे समाधान मिळत होते. त्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले अडचणी वर मात करत प्रमाणिकपणे नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या त्या पोरांतही मला साक्षात देव दिसला. डोंगरी बांधवाना भेटताना त्यांचे प्रेमाचे , स्नेहाचे आपुलकीचे बोलणे व त्यांचा भरभरुण पाहुणचार करणाऱ्या स्वभावातही मला साक्षात देव दिसला. साध्या भोळ्या भाबड्या , मायाळू आजी म्हणजे ही मला परमेश्वरच भासल्या. अमावस्येला सगळे देवाला जातात . पण मला माझा देव डोंगरातच दिसला. अंधार पडला .. उशीर होत होता तरीही गावात एम. पी. एस. सी . परीक्षा देणाऱ्यां विद्यार्थ्याला भेटलो आज तुला कोणती पुस्तके मिळाली चर्चा केली .जी पुस्तके मिळाली नाहीत त्याची यादी कर ती पुस्तके देण्याचे नियोजन करतो. असे म्हटल्यावर पुण्यातील अनुभव सांगत अधिकारी पदाची स्वप्ने बघून अनंत अडचणीवर मात करत अधिकारी पदाची स्वप्ने पाहणाऱ्या त्या युवकांतही मला साक्षात परमेश्वर* *दिसला. वेळ झाला होता. तरीही एका विद्यार्थ्यांशी बोलणे केले व सांगली येथे धावणे प्रशिक्षणाची तुम्हां पाच विद्यार्थ्यांचे नियोजन करतो असे सांगितले ते ही या देवाचीच सेवा ना …. रात्रीचा बराच वेळ झाला होता. एक मन म्हणत होते आज दिवस तर डोंगरावरच गेला. उद्याच्या गुढीपाडव्याचे नियोजन कसे ? रात्री बराच वेळ झाला . परतीचा 65 किमीचा प्रवास सुरु झाला . उद्या गुढी तर आमच्या घरची कधी उभी राहिल मला माहित नव्हते. पण गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी डोंगरी , दुर्गम , जंगल , भागातील विद्यार्थ्यांच्या मनात व डोंगरी अंगणात क्रीडा , शिक्षण व करीअरची गुढी मात्र गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी ताठ मानेने उभी राहीली होती. याच आत्मिक समाधानात … अमावस्येच्या काळ्या कुट्ट अंधारात गाडी वाट शोधत ईश्वर चरणी जाऊन परतीचा प्रवास करत होती.
*आपला*
*श्री.सुधीर बंडगर*
*डोंगरी ग्रंथालय , डोंगरी क्रीडा साहित्य केंद्र*
*चांदोली*

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!