ताज्या घडामोडी

श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी उभारलं प्रवेशद्वार

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

श्री शिवछत्रपती विद्यालय शिराळा मध्ये माजी विद्यार्थी १९९६ बॅच यांच्याकडून साडेतीन लाख रुपये खर्चाचे प्रवेशद्वार बांधकाम करून भेट देण्यात आले या प्रवेशद्वाराचे उद्घाटन परमपूज्य स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेचे अध्यक्ष व शिराळा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती एडवोकेट भगतसिंह नाईक नाना संस्था सचिव विश्व प्रताप सिंग नाईक दादा शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस एम पाटील सर संचालक जगन्नाथ बाउचकर व 1996 बॅचचे सर्व माजी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत माननीय भगतसिंह नाईक नाना यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी बोलताना भगतसिंह नाईक नाना म्हणाले श्री शिवछत्रपती विद्यालयांमध्ये शिक्षण घेतलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती आपलेपणाची भावना जोपासण्याचे काम करून 26 वर्षानंतर सर्वांना एकत्रित करून एक उत्कृष्ट प्रवेशद्वार घडवलेल्या चिऱ्यामध्ये बांधून देण्याचे काम करून शाळेच्या ऋणातून काही प्रमाणात मुक्त होण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे संस्था त्यांच्या कार्याला शुभेच्छा देत आहे या विद्यार्थ्यांच्या एकत्रित येण्यामधून विद्यालयाच्या प्रांगणात एक भव्य अशा प्रकारची आकर्षक वास्तू उभा राहिली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे यावेळी बोलताना माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी युवा उद्योजक प्रवीण माळी म्हणाले विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एम पाटील सर यांनी केलेल्या आवाहनाला आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी साथ दिली सरांचे आमच्याशी शाळेच्या प्रांगणातून आम्ही बाहेर गेलो तरी नेहमीच जिव्हाळ्याचे आणि स्नेहाचे संबंध राहिलेले आहेत या स्नेहबंधामधूनच आम्ही हे कार्य आम्हा सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या सहकार्यांमधून पूर्णत्वास नेऊ शकलो प्रत्येक विद्यार्थ्याने आप आपल्या कुवतीप्रमाणे मदत देऊन हे शिवधनुष्य पेलण्याचे कार्य केले आणि सर्वांच्या एकोप्यामधूनच साडेतीन लाख रुपये खर्चाचे प्रवेशद्वार आकर्षक व दिखाऊ स्वरूपात उभे राहू शकले याचे सर्व श्रेय माझ्या सर्व सहकारी मित्रांना आहे यावेळी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस एम पाटील सर म्हणाले 1996 च्या बॅचने विशेष परिश्रम घेऊन हे दिमाखदार प्रवेशद्वार उभे करून विद्यालयाच्या वैभव मध्ये भरच घालण्याचे काम केलेले आहे आणि येणाऱ्या पिढ्यांना आदर्श घालून दिला आहे की आपणही आपल्या विद्यालयाच्या प्रती आपलेपणाची भावना जपून काहीतरी भरीव काम विद्यालयासाठी करावे आणि शाळेने जे आपणावरती संस्काराचे धन मुक्तहस्ताने दिले त्याच्या रुणा मधून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न प्रत्येकाकडून होईल याबद्दल मनात मात्र ही शंका नाही या वेळेला 1996 बॅच च्या सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याबरोबरच त्यावेळी कार्यरत असणारे आणि आता सेवेतून निवृत्त झालेले सर्व आजी-माजी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते या प्रवेशद्वाराच्या बांधकामांमध्ये सर्वांना एकत्रित करण्यामध्ये युवा उद्योजक प्रवीण माळी इंजिनियर प्रवीण थोरात प्रवीण गायकवाड सत्यजित यादव प्रताप दिलवाले रणजीत पाटील मनोज खंडागळे सुनीता पाटील सीमा यादव सीमा पाटील यांनी पुढाकार घेऊन हे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी 26 वर्षानंतरच्या कालावधीनंतर विद्यालयांमध्ये एकत्रित झाले होते त्यांच्या चेहऱ्यावरून पुन्हा सर्वांना एकत्रित पाहून आनंद ओसंडून वाहत होता सर्व आजी-माजी शिक्षकांचा सत्कार भेटवस्तू व बुके देऊन या विद्यार्थ्यांच्याकडून करण्यात आला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रांमध्ये कशा पद्धतीने काम करत आहे याबद्दलचे मनोगत सर्वांनी मांडले आणि कार्यक्रमाची सांगता झाली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!