आरोग्य व शिक्षण

अण्णा हजारे प्रणित भष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास तळेगाव दाभाडे शहर नूतन कार्यकारिणी जाहिर

अध्यक्षपदी राजेश खंडेराव बारणे यांची निवड

Spread the love

तळेगाव : अण्णा हजारे प्रणित भष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास या संघटनेची तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी आज दि.१८ मार्च २०२२ रोजी सुशिला मंगल कार्यालय येथे जिल्हा संघटक माजी नगरसेवक अरुण माने तालुका अध्यक्ष अॅड्.संजय पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. याप्रसंगी नियुक्ती पत्र प्रदान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षपदी पत्रकार राजेश खंडेराव बारणे यांची एकमताने निवड करण्यात आली.त्याच बरोबर उपाध्यक्ष पदी नवनाथ मारूती कुल कार्याध्यक्षपदी दिलिप शंकरराव चौधरी सचिवपदी प्रा. योगेश अर्जुन घोडके यांची निवड करण्यात आली. तसेच जमीर नालबंद यांची मावळ तालुका कार्याध्यक्षपदी तर अॅड्.गणेश जगताप यांची तालुका कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना तालुका अध्यक्ष संजय पाटील आणि जिल्हा संघटक अरुण माने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!