Puneक्रीडा व मनोरंजनसामाजिक

इन्फिनिटी ९०.४ एफएम कम्युनिटी रेडिओ ची राष्ट्रस्तरीय पुरस्कारासाठी निवड.

Spread the love

इन्फिनिटी ९०.४ एफएम कम्युनिटी रेडिओ ची राष्ट्रस्तरीय पुरस्कारासाठी निवड.Infinity 90.4 FM Community Radio Nomination for National Award.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २२ नोव्हेंबर.

आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशिया, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अनेक उपक्रमांचे आयोजन केले होते. हे उपक्रम प्रभावी आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने राबविल्याबद्दल ‘पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या इन्फिनिटी ९०.४ एफएम’ या कम्युनिटी रेडिओची राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी निवड झाली आहे.येत्या २४ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथील युनेस्को भवन इथे आयोजित केलेल्या मिडिया चॅलेंज पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. योगाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भारतभरातील सुमारे २०० कम्युनिटी रेडिओंनी या उपक्रमात भाग घेतला होता. पैकी २० रेडिओंची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे.

‘सर्वांसाठी योग’ ही यावर्षीच्या योग दिनाची मध्यवर्ती संकल्पना होती. त्या अनुषंगाने इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओने दि. १ जून ते २८ जून २०२३ या काळात अनेक उपक्रम राबवले. यामध्ये रेडिओ सोबत योग, २१ दिवस २१ योग विचार, तसेच योग आणि विज्ञान, चेअर योग, योग आणि जीवनशैली, हास्ययोग, योग आणि मानसिक स्वास्थ्य, योगाच्या माध्यमातून स्वसंवाद, योग आणि ध्यान अश्या सात विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांचे ‘योगात् लभते स्वास्थ्यम्’ हे व्याख्यानसत्र रेडिओवरून प्रसारित करण्यात आले. त्याचबरोबर मस्ती की पाठशाला, वर्क फॉर इक्वॅलिटी या एनजीओंच्या सहकार्याने विविध राज्यांमधून आलेल्या बांधकाम कामगारांच्या आणि निराधार मुलांना अनुभवी प्रशिक्षकांनी योगाभ्यासाचे धडे आणि योगाची शपथ दिली.

संस्थेच्या रावेत येथील पीसीसीओइआर येथे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी योग प्रशिक्षण देण्यात आले. योग जीवनशैली आचरणाऱ्या नागरीकांकडून इन्फिनिटी ने योग करतानाचे व्हिडिओ मागवले होते. यामधील सहभागींना रेडिओच्या वतीने डिजिटल प्रशस्तीपत्र देऊन प्रोत्साहित केले गेले. याचबरोबर रेडिओवरून दर्जेदार कार्यक्रमांबरोबरच योगाचे महत्व सांगणाऱ्या सुंदर जिंगल वर्षभर प्रसारित होत असतात. सर्व सहभागींचे पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले आहे.

रेडिओच्या कार्यक्रमांमध्ये समाजातील गुणी कलाकार, विविध विषयांतील तज्ञ, सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था आदींनी आवर्जून सहभाग घ्यावा असे आवाहन इन्फिनिटी ९०.४ एफएम ने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!