इस्लामपूर येथील राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीमध्ये रविवार दि.३ जुलै २०२२ रोजी सकाळी १० वाजता मोफत दिव्यांग वधू-वर सूचक महामेळावा आयोजण
इस्लामपूर दि.२८ प्रतिनिधी
इस्लामपूर येथील राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीमध्ये रविवार दि.३ जुलै २०२२ रोजी सकाळी १० वाजता मोफत दिव्यांग वधू-वर सूचक महामेळावा आयोजित केला आहे. जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान,वाळवा तालुका राष्ट्रवादी दिव्यांग सेल व कर्मवीर वधू-वर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा महामेळावा संपन्न होत आहे. या महा मेळाव्या त दिव्यांग,अपंग,मूक बधीर,मतिमंद तसेच सर्वसाधारण घटस्फोटीत महिला अथवा पुरुष,तसेच दिव्यांग विधवा महिला व विधुर पुरुषांनी सहभागी व्हावे,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
या महामेळाव्यात सर्व जाती-धर्मातील दिव्यांग सहभागी होवू शकतात. तसेच घटस्फोटीत वधू-वर,विधवा व विधुरही सहभागी होवू शकतात. समाजात सध्या मोठ्या अपेक्षामुळे लग्न ठरणे ही मोठी समस्या बनली आहे. त्यामध्ये दिव्यांग घटस्फोटीत दिव्यांग पुरुष अथवा महिला, विधवा दिव्यांग महिला व विधुर दिव्यांग पुरुषांचे लग्न ठरविण्यात कोणी फारसे पुढाकार घेत नाही. त्यामुळे आम्ही सामाजिक बांधिलकीतून मोफत हा महामेळावा आयोजित केला असल्याची भावना संयोजकांनी व्यक्त केली.
या महामेळाव्यात सहभागी होवू इच्छिणाऱ्यांनी जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान चे समन्वयक इलियास पिरजादे (मो.नं.9960132171),वाळवा तालुका राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे अध्यक्ष रामचंद्र पाटील (मो.नं.9922774425) व कर्मवीर वधू-वर सूचक केंद्राचे संचालक शंकर शिंदे (मो.नं.7020623992) यांच्याशी संपर्क करावा. सौ.उज्ज्वला पाटील,सौ.वर्षा माने, सौ.ज्योती डुबल यांच्यासह तिन्ही संस्थांचे कार्यकर्ते हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.